"मी सर्व टॅक्स भरतो, IT ने कुठे छापमारी मारावी हा त्यांचा अधिकार"

मी 30 वर्ष राजकारण करतोय, तुम्ही अजितदादांनी व्यवस्थित ओळखता
"मी सर्व टॅक्स भरतो, IT ने कुठे छापमारी मारावी हा त्यांचा अधिकार"
"मी सर्व टॅक्स भरतो, IT ने कुठे छापमारी मारावी हा त्यांचा अधिकार"Saam Tv

वैदेही काणेकर

मुंबई : भाजपाचे BJP नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya यांनी राष्ट्रवादीचे NCP अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar ठाकरे सरकारवर निशाणा साधला. जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवारांना Ajit pawar किरीट सोमय्यांनी 'चॅलेंज' केले होते. त्यांच्या आरोपामुळे महाराष्ट्रात राजकीय Maharashtra Politics वातावरण चांगलेच ढवळून निघालं आहे. तर माहितीनुसार अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे समजते आहे. कारण अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाचा छापेमारी Incom Tax Department झाल्याची बातमी समोर येत आहे. यावर आज पत्रकार परिषेदत बोलत होते, त्यांनी यावेळेस स्पष्टपणे सांगितलं की, मी कोणताही कर चुकवत नाही.

हे देखील पहा-

यावर अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी ते मुंबईत बोलत होते. अजित पवार आज स्पष्टीकरण देत म्हणाले, IT ने कुठे छापमारी मारावी हा त्यांचा अधिकार आहे. मी सर्व टॅक्स भरतो. ही धाड राजकीय हेतूने टाकली आहे. यात काय सापडलं हे तेच सांगतील. पण ज्या माझ्या बहिणी ज्यांच्या 35 वर्षांपूर्वी लग्न झाली, 1 कोल्हापूर आणि 2 पुण्याच्या बहिणीच्या कारखान्यावर का धाडी टाकल्या? हे सांगावं.

ते म्हणाले, अजित पावरचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर जनतेने विचार कारावा कोणत्या स्थरावर जाऊन संस्थांचा वापर केला जातो आहे. वेड वाकड काही मिळाला तर कारवाई करण्याचा अधिकार आहे. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायचा हे कळत नाही. पवार साहेबांचा एका बँकेशी काडीचा संबंध नसताना ED ची कारवाई झाली.

आज मी नागरिकांना त्रास न होता दर्शन घेतलं. मी दर्शन दर्शन घेतल्यावर मला ही बातमी कळली. पण मी काम करत आहे. किरीट यांच्याबाबत मला काही माहित नाही असेही ते म्हणाले.

"मी सर्व टॅक्स भरतो, IT ने कुठे छापमारी मारावी हा त्यांचा अधिकार"
Navi Mumbai: स्पायडरमॅन बनून खारघर परिसरात चोरी करणाऱ्या गॅंगला अटक

तसेच ते पुढे म्हणले, प्रत्येकाची कामाची पद्धत ही त्या त्या सरकारप्रमाणे आहे. मीडियावर दबाव आहे की काय अशी शंका येते. आज माझ्या शी संबंधिक कंपनीवर या धाडी टाकल्या. माझ्या बहिणी आहेत म्हणून आशा धाडी टाकतात. नात इतकाच संबंध आहे. यातून काय अर्थ काढायचा तो काढा.

केंद्रीय संस्था काम करताना राज्यातील काही संस्था काम करतात. उद्या काही केंद्रीय संस्था काम करतात तेव्हा इतर पक्षाचे लोक म्हणतात ते नियमानुसार आहे. त्यांच्या कोणत्या कंपनीवर धाड टाकली. कोणी कधी त्या नेत्यांवर करवाई केली आहे का?

महाराष्ट्राचा राजकारण सुसंकृत आहे. एखाद्या व्यक्तीकडून काही कमीजास्त झालं असेल त्या राज्यात अस राजकारण कोणी नाही केलं. सत्तेचा गैरवापर कधी आम्ही केला नाही. उद्याचं निवडणूक येतील तेव्हा जनतेने ठरवावे. देशाचा सर्वांगीण विकास करायला हवा. तसेच शेवटी ते म्हणाले, मी 30 वर्ष राजकारण करतोय, तुम्ही अजितदादांनी व्यवस्थित ओळखता.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com