pregnant wife found death in toilet after husband come at home
pregnant wife found death in toilet after husband come at home Saam tv
देश विदेश

पाणीपुरी घेऊन घरी पोहोचला पती; तेव्हा 'बाथरूम'मध्ये आढळला पत्नीचा मृतदेह

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गाझियाबाद : गाझियाबादच्या साहिबाबादमध्ये अज्ञातांनी घरात घुसून गरोदर महिलेचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या अज्ञात नराधमांनी महिलेचा गळा आवळून खून केला आहे. त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू देखील चोरी (Robbery) केल्या आहेत. महिलेचा खून (Murder) करताना घरातील वृद्ध महिलेला गॅलरीत कोंडल्यानंतर हा प्रकार केला आहे. यामुळे साहिबाबाद परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. (pregnant wife found death in toilet after husband come at home )

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कुमार हे डिएलएफ कॉलनी येथे आशीर्वाद इमारतीत १७ क्रमांकाच्या ब्लॉक ए-३१ मध्ये राहतात. त्यांच्यासोबत त्यांची २० वर्षीय पत्नी संतोषी आणि वृद्ध आई राहते. शुक्रवारी संतोष कुमार हे कामासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या घरात काही अज्ञात नराधम शिरले. त्यांनी संतोष कुमारच्या वृद्ध आईला गॅलरीत कोंडले. त्यानंतर एक महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा तारीने आवळत खून केला. तसेच नराधमांनी घरातील मौल्यवान वस्तूही चोरल्या. दरम्यान, रात्री संतोष कुमार कामावरून घरी येताना बाजारातून पाणीपुरी घेऊन पोहोचला. त्यावेळी त्याला घरातील वीज बंद दिसली. घरात आईला आवाज दिल्यावर त्याची आई गॅलरीत कोंडलेल्या अवस्थेत आढळली. तर पत्नीचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला. त्यानंतर त्याने एकच टाहो फोडला. तसेच घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्यानंतर तातडीने पोलिसांना सदर प्रकार सांगितला. गरोदर असलेल्या पत्नीच्या हत्येचा आरोप त्यांनी घरात राहणाऱ्या मजूर आणि कंत्राटदार विपिनवर लावला आहे.

दरम्यान, गरोदर महिलेच्या हत्येने स्थानिक पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गाझियाबादच्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत हत्येचा पंचनामा केला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, हत्येची घटनेची माहिती कळताच संतोष कुमार यांनी पोलिसांना कळविले होते. पोलिस घटनास्थळी पोहोचताच त्यांना महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला. तसेच कपाटाचे टाळा तोडल्याचेही आढळून आले. सदर प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. तसेच मृतदेह हा पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT