Prashant Kishor Saam Tv
देश विदेश

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांची प्रकृती खालावली, ICU मध्ये दाखल, डॉक्टर काय म्हणाले?

Prashant Kishor health update: जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांना पाटणा येथील खासगी रूग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आमरण उपोषणाला बसले होते.

Bhagyashree Kamble

प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांना पाटणा येथील खासगी रूग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून बीपीएससी परीक्षा लीक प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीनही मिळाला होतं. मात्र, घरी गेल्यानंतर त्यांची आणखीन तब्येत खालवली. त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

डॉक्टरांनी या संदर्भात त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. प्रशांत किशोर यांच्या यांना घशासंबंधित त्रास आहे. रूग्णालयात जाण्यापूर्वी त्यांनी आमरण उपोषण सुरूच राहील असं सांगितलं होतं. ते फक्त पाणी पीत होते. आज ७ डिसेंबरला सत्याग्रह समितीची बैठक झाली. त्यात आंदोलन सुरूच राहणार हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारी ४ वाजेच्या सुमारास पोलिसांनी प्रशांत किशोर यांना गांधी मैदानावरून ताब्यात घेतलं. त्यानंतर पाटणा पोलिसांनी आंदोलनस्थळावरून आंदोलकांना जायला सांगितलं. पोलिसांनी ही कारवाई केली, तेव्हा प्रशांत किशोर हे त्यांच्या समर्थकांसह आंदोलनस्थळी झोपले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, न्यायालयानं प्रशांत किशोर यांना सशर्त जामीन मंजूर केला.

मात्र, त्यांनी तो मान्य केला नाही. त्यानंतर न्यायालयाने कोणत्याही अटीशिवाय जामीन मंजूर केला. त्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले आणि त्यांच्या निवास्थानी गेले. घरी गेल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

तुरूंगात जाण्यापूर्वी प्रशांत किशोर काय म्हणाले?

'आपल्याला थांबायचे नाहीये. जर थांबलो तर सरकारला बळ वाढल्यासारखं वाटेल. त्यामुळे जामीन पण घ्यायचा नाही आणि उपोषण पण तोडायचे नाही. प्रशासनाला जे काही करायचे आहे, ते त्यांना करू द्या. प्रशासनाला वाटलं त्यांना अटक करू, नंतर जामीन दिल्यानंतर विषय संपेल. पण आपण माघार घ्यायची नाही.' असं तुरूंगात जाण्यापूर्वी प्रशांत किशोर म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakshmi Puja Upay : लक्ष्मीपूजनात करा सोपे वास्तू उपाय,आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही

Lakshmi Puja 2025: लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवण्याचे ८ सोपे पर्याय; खायची पानं, फुलं आणि दिव्यांनी सजवा कलश

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Kalyan : बोगस मतदार व यादीत घोळ; शिवसेना उबाठा आक्रमक, बोगस मतदाराना शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा

Actress Accident: चालत्या गाडीवर रॉकेट आला अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थोडक्यात जीव वाचला

SCROLL FOR NEXT