Prajwal Revanna Saam Tv
देश विदेश

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाला भारतात येताच करणार अटक, कर्नाटक सरकारची घोषणा

Karnataka News: प्रज्वल रेवन्ना यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण 31 मे रोजी एसआयटी समोर हजार होणार असल्याचं सांगितलं होतं. आता कर्नाटक सरकारने ते भारतात येताच त्यांना अटक करण्यात येईल, असं म्हटलं आहे.

Satish Kengar

महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले खासदार प्रज्वल रेवन्ना यांना भारतात येताच अटक करण्यात येणार, असं कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले आहेत. ते म्हणाले की, प्रज्वल रेवन्ना यांना कुठे अटक करायची हे फक्त एसआयटीलाच ठरवायचे आहे. प्रज्वल रेवन्नाचे अनेक व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस सरकारने 28 एप्रिल रोजी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली होती. यानंतर रेवन्ना यांनी त्यांच्या वकिलामार्फत एसआयटीला सांगितले होते की, ते 7 दिवसांत हजर होतील, पण अद्यापही ते एसआयटी समोर हजर झाले नाही.

प्रज्वल रेवन्ना यांनीही यावेळी हसन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. हा वाद समोर येण्याआधीच त्यांच्या जागेवर मतदान झाले होते. दरम्यान, आज पत्रकारांनी परमेश्वर यांना विचारले की, रेवन्ना यांना फ्लाइटमध्ये चढताच अटक केली जाईल की, ते भारतात येण्याची वाट पाहतील. यावर बोलताना ते म्हणाले की, याचा निर्णय एसआयटी घेईल. एसआयटी त्यांच्या पद्धतीने काम करेल. रेवन्ना यांना कधी आणि कशी अटक करायची, हे एसआयटीलाच ठरवायचे आहे.

रेवन्ना यांच्या व्हिडीओबाबत त्यांनी सांगितले की, मी तो पाहिला आहे. त्याने हा व्हिडिओ का बनवला हे माहित नाही. परमेश्वरा म्हणाले की, रेवन्ना यांच्याविरोधात यापूर्वीच ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. याशिवाय एसआयटीनेही नोटीस दिली आहे. आता याप्रकरणी आरोपपत्रही दाखल होणार आहे. या प्रकरणाचे सत्य काय ते पाहावे लागेल. याबाबत सखोल तपास सुरू आहे.

अलीकडेच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये प्रज्वल रेवन्ना यांनी कुटुंबीय आणि जेडीएस कार्यकर्त्यांची माफी मागितली होती. माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

विरोधक आणि काही स्थानिक नेत्यांनी आपल्याविरोधात हे षडयंत्र रचल्याचा दावा रेवन्ना यांनी केला होता. यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि एकटाही पडलो, असे ते म्हणाले. आता मी कोर्टात हजर होणार आहे, असं ते म्हणाले. यासोबतच त्यांनी कुटुंबीयांची माफीही मागितली आहे. या प्रकरणी एसआयटीने प्रज्वल यांची आई भवानी रेवन्ना यांनाही नोटीस बजावली असून त्यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कॅफेमध्ये मैत्रिणीसोबत बसला होता, टोळक्याकडून अमानुष मारहाण; तरुणाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये बिऱ्हाड आंदोलक पुन्हा आक्रमक

MPSC Recruitment : 'एमपीएससी'कडून PSIच्या पदांसाठी मेगाभरती जाहीर; अर्जप्रक्रिया कधी सुरु होणार? वाचा सविस्तर माहिती

Side Effects Of Onion: रात्री कांदा का खाऊ नये? कारण जाणून घ्या

Accident: क्षणात भयंकर घडलं! दादरमध्ये सलमान खानच्या अंगावर झाड पडलं

SCROLL FOR NEXT