Prajwal Revanna Court Verdict x
देश विदेश

Prajwal Revanna : ४७ वर्षीय मोलकरणीवर बलात्कार, माजी खासदाराला जन्मठेप; काय आहे प्रकरण?

Prajwal Revanna Court Verdict : भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Yash Shirke

  • माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेपेची शिक्षा

  • ४७ वर्षीय मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी

  • बंगळुरू विशेष न्यायालयाचा निकाल समोर

Prajwal Revanna News : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि हासन मतदारसंघातील माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बंगळुरूमधील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. काल (१ ऑगस्ट) रेवण्णा यांना ४७ वर्षीय मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले होते. रेवण्णा यांच्यावर बलात्कार, लैंगिक छळ, पुरावे नष्ट करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

बंगळुरूच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश यांनी प्रज्वल रेवण्णा यांना अटक झाल्यानंतर १४ महिन्यांनी आणि खटला सुरु झाल्यानंतर आठ आठवड्यांच्या आत हा निकाल दिला. काल न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रज्वल रेवण्णा न्यायालयामध्ये भावनिक झाले होते. ते न्यायालयात रडू लागले होते. त्याआधीही न्यायालयात ते रडले होते, त्यांनी कमी शिक्षा व्हावी अशी विनंती केली होती.

म्हैसूरच्या केआर नगरमधील एका ४७ वर्षीय मोलकरणीच्या तक्रारीनंतर माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेवण्णा यांनी पीडित महिलेवर बलात्कार केला, त्या कृत्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असे फिर्यादीत नमूद केले होते. या प्रकरणात सीआयडीच्या विशेष तपास पथकाने तब्बल दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. तपास सुरु असताना पोलिसांनी १२३ पुरावे गोळा केले होते.

३१ डिसेंबर २०२४ रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली होती. त्यावेळेस न्यायालयामध्ये २३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या होत्या. या प्रकरणात पीडितेची साडी हा मुख्य पुरावा मानला गेला. या साडीवर शुक्राणू सापडल्याचे म्हटले जात आहे. न्यायालयाने व्हिडीओ क्लिप्स, फॉरेन्सिक अहवाल आणि अन्य तपासणी अहवालांचा आढवा घेत सात महिन्यांनी निकाल दिला. काल या प्रकरणाचा निकाल जाहीर झाला, तर आज रेवण्णा यांच्या शिक्षेची घोषणा करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला मोठं खिंडार, अनेक बडे नेते, संरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Asim Sarode On Atharva Sudame: अथर्व सुदामेसाठी असीम सरोदे मैदानात, थेट राज ठाकरेंना लावला फोन| पाहा व्हिडिओ

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

SCROLL FOR NEXT