Tension escalates outside Gandhi Bhavan in Indore as BJP and Congress workers engage in violent clash. saam tv
देश विदेश

BJP Vs Congress: भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा; पक्षाच्या कार्यालयावर फेकले दगड, टोमॅटो अन् तेलाच्या पिशव्या

Stone Pelting On Congress Office: इंदूरमधील गांधी भवनाबाहेर भाजप युवा मोर्चा (BJYM) आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हिंसक राडा झाला. दिल्लीत काँग्रेसच्या अर्धनग्न निषेधाचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चा आला होता.

Bharat Jadhav

  • इंदूरमधील गांधी भवनाबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हिंसक राडा.

  • भाजप युवा मोर्चाच्या निषेधामुळे तणाव वाढला.

  • दगड, बाटल्या, तेलाच्या पिशव्या आणि टोमॅटो फेकल्याची माहिती.

मध्य प्रदेशची राजधानी इंदूरमध्ये शनिवारी राजकीय नेते रस्त्यावर उतरले. शहरातील गांधी भवनाबाहेर काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये हाणामारी झाली. भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अर्धनग्न निदर्शनाच्या निषेधार्थ भाजपवायएमचे कार्यकर्ते गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयाला घेराव घालण्यासाठी पोहोचले होते.

या निषेधाचे रूपांतर हिंसक वादात झाले आणि परिसरात गोंधळ उडाला. काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आधीच उपस्थित होते, याचा निषेध केला, ज्यामुळे वाद आणखी वाढला.

बाटल्या, टोमॅटो आणि फेकले दगड

परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून,पोलिसांनी दोन्ही बाजूंमध्ये बॅरिकेड्स उभारून आणखी वाद रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु निदर्शकांचा राग शांत राहिला. पाण्याच्या बाटल्या, तेलाच्या पिशव्या आणि दगडफेक करण्यात आली. कार्यालयावर संत्री आणि टोमॅटो देखील फेकण्यात आली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष विपिन वानखेडे यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झालेत. तसेच दोन पत्रकारांसह अनेक लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केल्याचा आरोप केलाय. दरम्यान जेव्हा काँग्रेस नेत्यांना माहिती मिळाली की भाजयुमोचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाला घेराव घालण्यासाठी येत आहेत, तेव्हा त्यांनी पूर्ण तयारी केली. काँग्रेस कार्यकर्ते, नगरसेवक आणि इतरांना कार्यालयात येण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Paratha: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर पराठा; नाश्त्याचा बेत होईल भारी

By-Election: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ? उद्धव ठाकरे काय करणार?

Pune : शक्तिवर्धक औषध घेणं जिवावर बेतलं ! धावता-धावता मानसिक संतुलन बिघडलं, पोलीस भरती दरम्यान घडला भयानक प्रकार

Maharashtra Live News Update : सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस-गारपिटीचा कहर; 3 एकर पपईची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT