Congress headquarters in West Bengal attacked after Rahul Gandhi’s controversial remark; three arrested saamtv
देश विदेश

Attack On Congress Headquarter: राहुल गांधींच्या विधानानंतर वाद विकोपाला; काँग्रेस मुख्यालयावर हल्ला

BJP Leader Attack On Congress Headquarters: कोलकाता येथील काँग्रेसच्या मुख्यालयावर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आलीय. या हल्ल्यातील मुख्य आरोपी स्थानिक भारतीय भाजप नेते राकेश सिंह असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

Bharat Jadhav

  • राहुल गांधींच्या विधानानंतर पश्चिम बंगालमध्ये तणाव.

  • काँग्रेस मुख्यालयावर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला.

  • राहुल गांधींच्या फोटोला काळं फासण्यात आले तर कार्यालयाबाहेर टायर जाळण्यात आली आहेत.

खासदार राहुल गांधींच्या विधानानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलंय. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर काँग्रेस कमेटीच्या मुख्यालयावर हल्ला झालाय. या हल्ल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलीय. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी संतोष राजवा आणि त्याचे दोन साथीदारांना अटक करण्यात आलीय.

या तिघांवर राहुल गांधींचे फोटोला काळं फासणं, पक्षाचे फलक फाडण्याचा प्रयत्न आणि परिसरात उपस्थित असलेल्या लोकांना धमकावण्याचा आरोप करण्यात आलाय. या तिन्ही आरोपींनी आपल्या साथीदारांसह सीआयटी रोडवरील काँग्रेस कार्यालयाबाहेर टायर जाळलेत. तसेच कार्यालयात जबरदस्तीनं घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या तिघांवर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यातील मुख्य आरोपी स्थानिक भारतीय जनता पक्षाचा नेता राकेश सिंह असून तो फरार झालाय. पोलिसांकडून राकेश सिंह आणि इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, आम्ही लवकरच इतर आरोपींना पकडू. या हल्ल्याचे नेतृत्व राकेश सिंह यांनी केले होते. राकेश सिंह यांनी काही दिवसापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. राहुल गांधी यांनी बिहारमधील 'मतदार अधिकार यात्रे' दरम्यान पंतप्रधानांविरुद्ध वक्तव्य केलं होतं. त्याचा निषेध राकेश सिंह यांनी केला होता.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वी राहुल गांधींनी मतचोरीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलाय. भाजप मतांची चोरी करून सत्तेत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. त्यावरून देशातील राजकारणात मोठी खळबळ माजली असून आरोप प्रत्यारोप केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याची हत्या, कारच्या चाकाखाली चिरडलं; थरकाप उडवणारा CCTV व्हिडिओ

High Pesticide Fruits: सर्वाधिक कीटकनाशकांचा वापर होणारी फळे कोणती? खाण्यापूर्वी काळजी घ्या

Vishwajeet Kadam : सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करू नये; काँग्रेस नेते विश्वजित कदम

Jammu Kashmir Flood : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलन; चिनाब-झेलमला पूर, पुलवामामध्ये केली घरे रिकामी, राजोरीमध्ये आई-मुलीचा मृत्यू

Sai Tamhankar: हे, असं पाहिलं काहूर माजलं, जीवात जीव विरघळलं...

SCROLL FOR NEXT