Amit Shah : अमित शहा यांचं शीर धडावेगळं करून टेबलावर ठेवा; महिला खासदाराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

mahua moitra on Amit Shah : तृणमूल काँग्रेसच्या खासदाराच्या अमित शहा यांच्यावरील वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमित शहा यांचं शीर धडावेगळं करून टेबलावर ठेवण्याचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं आहे.
mahua malhotra news
mahua malhotra news
Published On
Summary

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचं चिथावणीखोर वक्तव्य

अमित शहा यांचं शीर धडावेगळं करा' असं धक्कादायक वक्तव्य केल्याचा मोईत्रांव आरोप

सीमा सुरक्षेवरील अपयशावरून मोदी सरकारवर टीका

भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसात तक्रार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुओ मोईत्रा यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासदार मोइत्रा यांनी अमित शहा यांचं शीर धडावेगळं करण्याचं चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. पश्चिम बंगालमधील बेकायदेशीर घुसखोरांवर बोलताना मोइत्रा यांनी टीका केली.

महुआ यांनी म्हटलं की, 'माझा त्यांना प्रश्न आहे. ते फक्त बोलत आहेत. आमच्या राज्यात सीमा आहे. त्याची सुरक्षेची जबाबदारी त्यांची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून घुसखोरांवर भाष्य केलं. त्यावर अमित शहा यांनी टाळ्या वाजवल्या.

'आता भारतात सीमांचं रक्षण करणां कोणी नाही. दुसऱ्या देशातून दररोज शेकडो, हजार, लाखो लोक घुसखोरी करतात. आमच्या आई-बहिणींवर त्यांची वाईट नजर पडत आहे. आमच्या जमिनी हिसकावल्या जात आहे. त्यामुळे आधी अमित शहा यांचं शीर धडावेगळं करून टेबलवर ठेवलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

भारतात येणारे रोहिंगो आणि बांगलादेशातील घुसखोरांसाठी 'ऑपरेशन पुशबॅक' मोदी सरकारने राबवलं. परंतु महुआ मोइत्रा यांनी सीमा सुरक्ष दलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बीएसएफ काय करत आहे? आम्ही बीएसएफला घाबरतो. आमच्या बंगालमध्ये त्यांना घुसखोर दिसत नाही. बीएसएफकडून पश्चिम बंगालमधील स्थानिकांच्या जमिनींचं सरंक्षण करण्याची जबाबदारी सांभाळताना दिसत नाही.

महुआ यांच्या वक्तव्याने भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. संदीप मजूमदार नावाच्या भाजप कार्यकर्त्यांनी नदिया कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत तक्रार दाखल केली. तसेच भाजप कार्यकर्ता संदिप मजूमदार यांनी खासदार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीने पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com