बिडी बिहार’ पोस्टवरून काँग्रेस अडचणीत.
केरळ काँग्रेसनं माफी मागितली.
सोशल मीडिया प्रमुख व्हीटी बलराम यांचा राजीनामा.
बिहारमध्ये विधान निवडणुकीचा धुराळा उडालाय. राज्यातील जेदयु भाजपचे सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसलीय. प्रचारांनी जोर धरलाय. त्याचदरम्यान केंद्र सरकारनं जीएसटीमध्ये बदल करत सर्व सामान्यांना दिलासा दिलाय. त्यावरून काँग्रेसनं केंद्रावर टीका केलीय. बिहार निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून केंद्राने हा निर्णय घेतल्याच विरोधक म्हणत आहेत. तोच धागा पकडून सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल करताना काँग्रेस आपल्याच विधानांमुळे अडचणीत आलीय. जीएसटीवरून हल्लाबोल करताना केरळ काँग्रेसने बिडी बिहारची टिप्पणी केली होती. मात्र त्यामुळे काँग्रेसला आता माफी मागावी लागलीय.
केरळ काँग्रेसने शनिवारी कबूल केले की, सोशल मीडियावरील बिहारला 'बिडी'शी जोडणारी वादग्रस्त पोस्ट करणं मोठी चूक होती. दरम्यान या पोस्टमुळे राजकारणात खळबळ उडाली होती. काँग्रेस पक्षाने ही पोस्ट काढून टाकत जाहीरपणे माफीही मागितली. वृत्तानुसार या वादात केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख व्हीटी बलराम यांनी राजीनामा दिलाय.
केरळ राज्यातील काँग्रेस कमेटी KPCC चे अध्यक्ष सीन जोसेफ यांनी ही चूक कबूल केलीय. पोस्ट करण्यात चूक झालीय, बेजबाबजदारपणे ही पोस्ट करण्यात आल्याचं त्यांनी मान्य केलंय. एका टीव्ही चॅनेलशी बोलताना त्यांनी सांगितले की, पक्षाच्या सोशल मीडिया टीमने सावधगिरी न बाळगता प्लॅटफॉर्म एक्सवर ही टिप्पणी पोस्ट केली आहे. 'पोस्ट काढून टाकण्यात आली आहे.
जबाबदार व्यक्ती, सोशल मीडिया हँडलचे अॅडमिन आणि ऑपरेटरने माफी मागितली आहे. त्यांनी पोस्ट काढून टाकली असून काँग्रेस याचे समर्थन करत नाही, असं सनी जोसेफ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या पोस्टप्रकरणी केपीसीसीच्या डिजिटल मीडिया सेलचे प्रभारी माजी आमदार व्हीटी बलराम यांच्याशी या विषयावर चर्चा झाली. व्हीटी बलराम यांनी सोशल मीडिया हेडचा राजीनामा दिलाय.
केपीसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर जीएसटी दरातील बदलांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये बिहारला बिडी (तंबाखू भरलेली वस्तू) शी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोस्टमध्ये लिहिले होते-'Bidis and Bihar start with B. Cannot be considered sin anymore.'
ही पोस्ट मोदी सरकारने बिडीवरील जीएसटी दर कमी करण्यावर केंद्रित होती. पण ही पोस्ट व्हायरल झाली आणि बिहारबद्दल असंवेदनशील आणि अपमानास्पद असल्याचं म्हणत काँग्रेसवर टीका करण्यात आली. बिहारमधील सत्ताधारी नेत्यांनी काँग्रेसवर टीका केलीय. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सम्राट चौधरी यांनी या पोस्टला 'संपूर्ण बिहारचा अपमान' असल्याचं म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.