abhijeet dipke news  Saam tv
देश विदेश

PM मोदी-अभिजीत दीपकेंची भेट? संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ, CJP अध्यक्ष म्हणाले...

Abhijeet dipke news : अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिजीत दीपकेंची भेट घेतल्याचा दावा राऊतांनी केला आहे. संजय राऊतांच्या आरोपांना दीपकेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

संजय राऊतांच्या आरोपांना अभिजीत दीपके यांचं प्रत्युत्तर

दीपके यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीचे आरोप फेटाळून लावले

पुणे : दिल्लीच्या 'जंतर मंतर'वर कॉकरोच जनता पार्टीने जोरदार आंदोलन केलं. दिल्लीनंतर कॉकरोच जनता पार्टीने देशातील विविध शहरात आंदोलन करण्याची रणनीती आखली आहे. त्यानुसार कॉकरोच जनता पार्टी पुण्यात आंदोलन करणार आहे. या आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्यावर संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केला आहे. संजय राऊत यांच्या दाव्यावर अभिजीत दीपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीत दीपके हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी केलेला दावा फेटाळून लावला. अभिजीत दीपके म्हणाले, 'पुण्यात आज आंदोलन होणार आहे. आज आम्ही कॉकरोच जनता पार्टी चा जाहीरनामा जाहीर करणार आहोत. आमच्या जाहीरनाम्यामध्ये तरुणांसाठी अनेक गोष्टी असणार आहेत. माझा नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या तपासाबाबत माझा यंत्रणावर विश्वास नाही'.

'माझी आणि पंतप्रधान मोदी यांची कशी भेट होईल? ते खूप मोठे आहेत आणि पंतप्रधान आहेत. माझी कुठली ही भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेली नाही. संजय राऊत यांच्याकडे असलेला फोटो एआयने तयार केलेला असावा. आमची संजय राऊत यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे, असेही दीपके यांनी सांगितले.

संजय राऊत यांची पोस्ट जशीच्या तशी

कॉकरोच जनता पार्टी हा भारतीय तरुणांचा संताप आणि चीड आहे. या तरुणांची फसगत होता कामा नये, उलट तो संताप अधिक प्रभावी आणि नियोजित मार्गाने व्यक्त होणे गरजेचे आहे, असे माझे मत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी तरुणांचे आंदोलन यशस्वी होण्याबाबत शुभेच्छा दिल्या. तरुणांना न्याय आणि दिशा हवी आहे. या आंदोलनात संघ प्रवृत्ती घुसून त्यांचे 'अण्णा' आंदोलन होऊ नये यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांना सतर्क राहावे लागेल, बाकी काय? मोदींना पंतप्रधानपदी बारा वर्षे झाली तो उत्सव डोळे भरून बघत राहूया, जय महाराष्ट्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT