Abhishek Banerjee News  AI Image
देश विदेश

Political News : मोठी बातमी! खासदारांच्या घराची रेकी केली अन् मध्यरात्री हल्ला करून फरार; भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

Abhishek Banerjee Attack News : पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला झाल्याचा आरोप. भाजपवर निशाणा साधत त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Alisha Khedekar

  • पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत

  • अभिषेक बॅनर्जी यांनी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या घरावर हल्ला

  • घर आणि कार्यालयावर काही दिवसांपासून संशयित व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा दावा

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आरोपामुळे बंगालच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली. काही दिवसांपासून काही संशयित व्यक्ती आपल्या घराची आणि कार्यालयाची पाहणी करत होते. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर काही तासांतच घरावर हल्ला झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला. गेल्या सहा महिन्यांत आपल्या जीवाला सात वेळा धोका निर्माण झाल्याचा दावा त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. तसेच या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लवकरच व्हायरल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याआधीही अभिषेक यांनी त्यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाजवळ काही अनोळखी व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचा आरोप केला होता. विचारणा केली असता या व्यक्तींनी आपण पोलीस असल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृह मंत्रालय आणि कोलकाता पोलिसांकडे केली होती.

दुसरीकडे भाजपने अभिषेक बॅनर्जी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजप नेते दिलीप घोष यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. अभिषेक यांना मारण्याची कोणाला गरज आहे, असा सवाल करत त्यांनी या आरोपांची खिल्ली उडवली. दरम्यान, या कथित हल्ल्यामुळे बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडच्या फरार इनामी नक्षलवाद्याला ३ दिवसांची ट्रान्झिट रिमांड

शरद पवार भाजपसोबत सत्तेत...; खासदार संजय राऊतांनी सगळंच सांगितलं|VIDEO

Toran Design: घराच्या मुख्य दरवाजावर कोणते तोरण लावल्याने लक्ष्मीची कृपा वर्षभर राहील? जाणून घ्या वास्तुचे नियम

Air Pollution : विषारी हवेमुळे हृदय, मेंदू आणि किडनीवर होतोय गंभीर परिणाम; डॉक्टरांचा गंभीर इशारा

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; न्यूझीलंडची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली, अवघ्या १३४ धावांत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT