Rajasthan Madan Rathore News  AI Image
देश विदेश

Political News : ".....तर भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील" भाजपच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांनी धरलं धारेवर

Rajsthan BJP Leader Madan Rathod News : पाकिस्तानबाबतच्या वक्तव्यामुळे राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड वादात सापडले. काँग्रेसने भाजपवर टीका केली असून, राठोड यांनी आपण क्रिकेटच्या संदर्भात बोलत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Alisha Khedekar

  • राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांच्या पाकिस्तानविषयक विधानामुळे राजकीय वाद

  • अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास भारत पाकिस्तानच्या बाजूने - मदन राठोड

  • मदन राठोड यांनी आपले वक्तव्य युद्धाबाबत नसून देशभक्तीवर असल्याचे म्हटले

पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या विधानावरून काँग्रेसने भाजपला घेरले आहे. दरम्यान, राठोड यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा करत स्पष्टीकरण दिले आहे. आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी वक्तव्याचा उलट अर्थ काढल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान यामुळे राजकीय वातवरण तापले आहे.

जयपूरमध्ये भाजपच्या मुख्यालयात गुरुवारी अल्पसंख्याक सेलच्या कार्यक्रमात बोलताना मदन राठोड यांनी पाकिस्तानसंदर्भात विधान केले होते. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास भारत शेजारी देश म्हणून पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील, असे ते म्हणाले. विरोधकांनी त्यांच्या या वाक्याचा उलट अर्थ लावल्याचा दावा त्यांनी केला. या विधानानंतर विरोधकांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मात्र, शुक्रवारी राठोड यांनी हे आरोप फेटाळले. त्यांनी माध्यमांसमोर बोलताना म्हटले की, मी केलेलं विधान हे युद्धाशी संबंधित नसून मी देशभक्तीवर बोलत होतो असे स्पष्ट केले. त्यांच्या मते, भाषणातील काही सेकंदांची व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करून संपूर्ण वाक्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. राठोड म्हणाले की, देशभक्ती हा त्यांच्या वाक्याचा मुख्य मुद्दा होता. त्यांनी उदाहरण देत म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना झाला तर, भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या आणि फटाके फोडणाऱ्या व्यक्तीला देशभक्त म्हणता येणार नाही.

पाकिस्तानला भारत शत्रूराष्ट्र मानतो आणि त्या देशातून दहशतवादाला प्रोत्साहन दिले जाते, असेही राठोड यांनी म्हटले. त्यामुळे आपल्या वक्तव्याचा संदर्भ समजून न घेता त्यावर टीका करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी या प्रकरणावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप नेत्यांच्या पाकिस्तानविषयक भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी राठोड यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी या प्रकरणी मदन राठोड यांच्यावर काय कारवाई केली जाणार, असा सवालही केला. या वक्तव्यामुळे राजस्थानमधील राजकीय वादाला नवे वळण मिळाले असून, राठोड यांच्या स्पष्टीकरणानंतरही भाजप आणि काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, समर्थकांची घोषणाबाजी

Dental Health Care चुकीच्या उपायांनी दात पांढरे करण्याच्या नादात होईल मोठं नुकसान? जाणून घ्या सत्य

Childhood obesity: मुलांमधील वाढतं वजन ठरतंय चिंतेचा विषय; लठ्ठपणामुळे मधुमेहासह अनेक आजारांचा धोका

Horoscope : ६ राशींचं नशीब पालटणार? १९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान करिअर आणि पैशाबाबत मोठे संकेत

EPFO चा मोठा निर्णय, पीएफ रिटर्न फाइल करण्याची मुदत वाढवली; शेवटची तारीख काय?

SCROLL FOR NEXT