Amit Shah Narendra Modi Death Threat Saamtv
देश विदेश

BJP Political news : भाजपमध्ये जुलै महिन्यात मोठे फेरबदल होणार? PM मोदी-अमित शाहांच्या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता

Political news : केंद्र सरकार आणि भाजप पक्षात काही बदल केले जाऊ शकतात.

साम टिव्ही ब्युरो

प्रमोद जगताप

New Delhi News : कर्नाटकतील पराभव आणि विरोधी पक्षांची झालेली एकजूट भाजपची आगामी काळात डोकेदुखी वाढवू शकते. देशात एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपने आपल्या रणनितीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपमध्ये जुलै महिन्यात मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकार आणि भाजप पक्षात काही बदल केले जाऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कालच्या भेटीत यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. (Latest Marathi News)

आगामी मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले जाणार असल्याची शक्यता आहे. केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Political News)

काँग्रेसने हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधील मतदारांना लोकप्रिय योजनांच्या सहाय्याने आकर्षित केले होते. ज्यामुळे 2024 मध्ये अनेक राज्यांमध्ये पक्षाला मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

हे पाहता पक्षाने आपली रणनीती बदलण्याची गरज असून त्याचा गांभीर्याने विचार केला जात आहे. भाजप सामाजिक आणि जातीय समीकरणे लक्षात घेत नव्या योजनांच्या मदतीने आपली व्होट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न करू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sai Tamhankar Photos : ये रेशमी जुल्फें, ये शर्बती आँखें, इन्हें देखकर जी रहे हैं सभी

वर्गातच शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य, चौथीतील मुलीसोबत नेमकं काय घडलं? पुणे हादरलं

Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात

Diwali Car Care Tips: एक ठिणगी होत्याचं नव्हतं करू शकते, यंदाच्या दिवाळीत गाडीची अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT