Pappu Yadav arrested at midnight in Patna Saam TV Marathi
देश विदेश

मध्यरात्री मोठी घडामोड, १२ वाजता खासदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ३१ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात कारवाई

MP arrest news today : बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना मध्यरात्री पाटणा पोलिसांनी अटक केली. 31 वर्षे जुन्या घर ताबा प्रकरणात कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून समर्थक आक्रमक झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Pappu Yadav arrested at midnight in Patna : शुक्रवारी रात्री बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना पोलिसांनी मध्यरात्री १२ वाजता अटक केली. ३१ वर्षे जुन्या प्रकरणात (Bihar MP arrested in 31 year old property case) पाटणा पोलिसांनी पप्पू यादव यांना अटक केली. १९९५ मध्ये भाड्याने घेतलेल्या पाटण्यातील एका घरावर कब्जा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पप्पू यादव यांनी प्रथम भाड्याच्या घरात आपले कार्यालय उघडले (Supporters protest after Pappu Yadav arrest) आणि नंतर ते घर ताब्यात घेतले. या प्रकरणात घरमालकाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. शुक्रवारी रात्री त्यांना पोलिसांनी अटक केली. (Patna police action against Purnia MP Pappu Yadav)

पप्पू यादव यांच्यावर १९९५ मध्ये घर हडपल्याचा (Supporters protest after Pappu Yadav arrest) आरोप आहे. त्यांच्याविरोधात बीएनएस अंतर्गत 419, 420, 468, 448, 506 आणि 120बी, त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने अटक करण्याच्या सुचना दिल्यानंतर रात्री १२ वाजता अटक केली. सकाळी त्यांना मेडिकल चेकअपसाठी रूग्णालयात नेहण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पप्पू यादव यांना अटक केल्यानंतर समर्थक आक्रमक झाले होते. शुक्रवारी रात्री पोलिस आणि खासदाराच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद आणि बाचाबाची झाली. पोलिसांनी पप्पू यादव यांना अटक केली, त्यानंतर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शुक्रवारी रात्री पप्पू यादव यांच्या कार्यालय आणि घराबाहेर जोरदार राडा झाला. पोलीस पप्पू यादव यांना अटक करण्यासाठी आले त्यावेळी समर्थकांनी घोषणाबाजी केली. पप्पू यादव यांनी पलिसांना अटक वॉरंट विचारले. कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही अटक करण्यासाठी आलो आहोत, असे पोलिसांकडून त्यांना सांगण्यात आले. ३५ वर्षे जुन्या प्रकरणात कोर्टाने त्यांचा जामीन रद्द केला होता, त्यानंतर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. खासदार पप्पू यादव यांनी आरोप केला की, कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट देण्यात आले नाही. रात्री उशिरा पोलिस अचानक अटक करण्यासाठी आले. दरम्यान, पाटणा शहराचे एसपी भानु प्रताप सिंह स्वतः पप्पू यादव यांना अटक केली. पोलिस खासदारांना घेऊन जात होते, त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला.

३५ वर्षे जुन्या प्रकरणात कोर्टाने पप्पू यादव यांना अनेकदा समन्स बजावले होते. पण ते हजर राहिले नाहीत. कोर्टाने त्यांचा जामीन रद्द केला अन् मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाकडून खासदार यादव यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. कोर्टाच्या आदेशानंतर शुक्रवारी रात्री पोलिसांनी पप्पू यादव यांना अटक केली. आज सकाळी त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, बिहार सरकार आणि गृहमंत्री सम्राट चौधरी त्यांना NEET विद्यार्थ्यासाठी लढल्याबद्दल धमक्या देत आहेत, असा आरोप याआदी खासदाराने केला होता. उपमुख्यमंत्र्यांना माझी हत्या करायची आहे, असा रोपही त्यांनी आज तकशी बोलताना केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लातूर जिल्हा परिषदेत भौतिक सुविधांचा अभाव

Mumbai Crime: मुंबई हादरली! भांडुपमध्ये शाळकरी मुलाची मित्रांकडून हत्या, आधी संपवलं नंतर तलावात फेकलं

Actress Assault: 'अचानक मला Kiss केलं...'; लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला नको तो प्रकार

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० हवेत? आजच करा eKYC; स्टेप बाय स्टेप करा फॉलो

Mumbai Crime : मुंबईत भर रस्त्यात महिलेची हत्या; नवऱ्याने चाकूने केले वार; सीसीटीव्ही Video व्हायरल

SCROLL FOR NEXT