Zilla Parishad Voting : मिनी विधानसभेचा धुरळा! पुणे, सोलापूरसह १२ झेडपीसाठी मतदान, कोण मारणार बाजी?

Maharashtra ZP Election Voting : महाराष्ट्रातील पुणे, सोलापूरसह 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Zilla Parishad elections voting today : पुणे, सोलापूर, धाराशिवसह राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी आज मतदान पार पडणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असणाऱ्या १२५ पंचायत समितीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. आज सकाळी साडेसात वाजता पासूनच नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केलेली आहे. (Maharashtra Zilla Parishad election live updates)

राज्यातील १२ जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान करता येणार आहे. एकूण मतदारांमध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष, 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला तर 468 इतर मतदारांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com