PNS Siddiqui Naval Air Base Saam Digital
देश विदेश

PNS Siddiqui Naval Air Base : पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल तळावर दहशतवादी हल्ला; स्फोटकं घेऊन आंतकवादी शिरले हवाईतळावर

Pakistan Second Largest Naval Air Base : पाकिस्तानमधील बलुचिस्तान पांतातील तुर्बत अंतरराष्ट्रीय एयरपोर्ट आणि नौदलाच्या एयरबेसवर सोमवारी रात्री दहशदवाद्यांना मोठा हल्ला केला. पीएनएस सिद्दीकी पाकिस्तानच्या नौदलाच दुसरा सर्वात मोठा हवाईतळ आहे.

Sandeep Gawade

PNS Siddiqui Naval Air Base Attack

पाकिस्तानमधील बलुचिस्तान पांतातील तुर्बत अंतरराष्ट्रीय एयरपोर्ट आणि नौदलाच्या एयरबेसवर सोमवारी रात्री दहशदवाद्यांना मोठा हल्ला केला. पीएनएस सिद्दीकी पाकिस्तानच्या नौदलाच दुसरा सर्वात मोठा हवाईतळ आहे. रात्री अचानक झालेल्या या हल्ल्यात स्फोटकं घेऊन दहशदवाद्यांनी हवाईतळात प्रवेश केला आणि गोळीबार सुरू केला. पाकिस्तानच्या सुरभा दलांने प्रत्युरादाखल केलेल्या हल्ल्यात ४ आतंकवाद्यांचा खात्मा केला.

यानंतर प्रतिबंधित बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) च्या माजिद ब्रिगेडने तुर्बतमधील नौदल एअरबेसवर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तान प्रांतात चीनच्या गुंतवणुकीला माजिद ब्रिगेडचा विरोध आहे. चीन आणि पाकिस्तान या प्रदेशात संसाधनांच्या नावावर शोषण करत असल्याचा आरोपही आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

द बलुचिस्तान पोस्टनुसार, बीएलएने दावा केला आहे की त्यांचे लढाऊ एअरबेसमध्ये घुसले आहेत. याशिवाय या तळावर चिनी ड्रोनही तैनात आहेत. हल्ल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी केच यांनी टीचिंग हॉस्पिटल तुर्बतमध्ये आणीबाणी लागू केली असून सर्व डॉक्टरांना तातडीने कर्तव्यावर हजर राहण्यास सांगितले आहे.

बीएलए मजीद ब्रिगेडने तुर्बतमध्ये केलेला हल्ला या आठवड्यातील दुसरा आणि या वर्षातील तिसरा हल्ला आहे. यापूर्वी 29 जानेवारी रोजी त्यांनी ग्वादरमधील लष्करी गुप्तचर मुख्यालय माच शहराला लक्ष्य केलं होतं. 20 मार्च रोजी तुर्बतमधील पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल हवाई तळावर हल्ला केला, असं द बलुचिस्तान पोस्टने वृत्त दिलं आहे. 20 मार्च रोजी पाकिस्तानमधील ग्वादर बंदर प्राधिकरण कॉम्प्लेक्समध्ये अनेक स्फोट आणि गोळीबार झाल्यानंतर सुरू झालेल्या लढाईत किमान दोन पाकिस्तानी सैनिक आणि आठ अतिरेकी मारले गेले.तहरीक-ए-तालिबाने नोव्हेंबर 2022 मध्ये युद्धविराम संपुष्टात आणल्यानंनतर खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये गेल्या वर्षभरात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT