PM Narendra in Australia
PM Narendra in Australia Saam TV
देश विदेश

PM Narendra in Australia : ऑस्ट्रेलियात मोदींचा जयजयकार! 'मोदी बॉस आहेत', ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची स्तुतीसुमनं

प्रविण वाकचौरे

PM Narendra in Australia : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये पोहोचले आहेत. सिडनीमध्ये मोदींचं मोठ्या जल्लोषात आणि भव्य स्वागत झालं आहे. लोकांना मोदी-मोदीचे नारे लगावले. मोदींची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर होते.

पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, ज्यामध्ये समाजातील सामंजस्य आणि दोन्ही समाजांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल.

मोदी बॉस आहेत

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधान मोदींचे जोरदार कौतुक केले. पंतप्रधान मोदी हे बॉस आहेत. मोदींचे स्वागत करणे हा बहुमान आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत एक स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध इंडो-पॅसिफिकसाठी वचनबद्ध आहेत. या दृष्टीकोनाला पाठिंबा देण्यासाठी आमची एकत्रित भूमिका आहे, अल्बानीज यांनी म्हटलं. (Political News)

मी वचन पूर्ण केले- मोदी

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात नमस्ते ऑस्ट्रेलियाने केली. 2014 मध्ये मी ऑस्ट्रेलियाला आलो होतो. त्यावेळी मी वचन दिले होते की, तुम्हाला पुन्हा 28 वर्षे भारताच्या पंतप्रधानाची वाट पाहावी लागणार नाही. आज मी पुन्हा तुमच्या समोर हजर आहे. मी एकटा आलो नाही. मी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत आलो आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.  (Latest Marathi News)

तुम्ही तुमच्या कामातून वेळ काढला, यावरून तुमची आम्हा भारतीयांबद्दलची आपुलकी दिसून येते. तुम्ही नुकतेच जे बोललात त्यावरून ऑस्ट्रेलियाचे भारतावर असलेले प्रेम दिसून येते. यावर्षी मला अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे स्वागत करण्याची संधी मिळाली. आज त्यांनी लिटिल इंडियाच्या पायाभरणीचे अनावरण करण्याची संधी दिली आहे. मी त्या व्यक्तीचे आभार मानतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Godrej Family Tree : गोदरेज समुहात विभाजन, आता कोण सांभाळणार व्यवसाय? वाटणीत कोणाला काय मिळालं?

Today's Marathi News Live : राहुल गांधी यांच्या सभेच्या वेळेत बदल, ⁠राहुल गांधी सभास्थळी ६.३० वाजता येणार

Amit Shah: उद्धव ठाकरे नकली सेनेचे अध्यक्ष, बाळासाहेबांचे नाव घेऊ नये; अमित शहांची टीका

Sanjana Sanghi: संजनाच्या सौंदर्याचा जलवा; हटके लूकने वेधले लक्ष

Pimpri Chinchwad News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; चार मुलींची सुटका

SCROLL FOR NEXT