Donald Trump Shahbaz Sharif Narendra Modi X
देश विदेश

Narendra Modi: 'आता चर्चा फक्त पीओकेवरच' मोदींनी पाकला ठणकावलं; ट्रम्प यांनाही इशारा

PM Modi : भारतानं पाकिस्तानसोबत चर्चेची तयारी दाखवली असली तरी चर्चा केवळ पीओकेवरच होणार असल्याची भूमिका घेतलीय... मात्र मोदी देशाला संबोधित करताना काय म्हणाले? त्यांनी पाकला काय इशारा दिलाय आणि अमेरिकेला कसं ठणकावलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये...

Bharat Mohalkar

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर लक्षभेदी हल्ले करत दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचं कंबरडं मोडलं.. त्यामुळे हैराण झालेल्या पाकिस्ताननं थेट अमेरिकेच्या मदतीनं शस्त्रसंधी केली आणि भारतासोबत चर्चेला तयार असल्याचं स्पष्ट केलं... मात्र पंतप्रधान मोदींनी चर्चा फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच होईल, अशा स्पष्ट शब्दात पाकिस्तानला ठणकावलंय..

अमेरिकेच्या मदतीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली... त्यानंतर अमेरिकेनं व्यापारी निर्बंध लादण्याच्या धमकीमुळे शस्त्रसंधी झाल्याचं म्हटलंय... एवढंच नाही तर काश्मीरबाबत मध्यस्थी करण्याची तयारीही दर्शवलीय...मात्र नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांची मध्यस्थीवरची ऑफर धुडकावून लावली.. यावेळी मोदींनी कोणते मुद्दे मांडले? पाहूयात...

- पाकिस्तानसोबत दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा

- दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही

- पाणी आणि रक्त सोबत वाहू शकत नाही म्हणत सिंधू जलवाटप करारावर स्पष्ट भूमिका

- ऑपरेश सिंदूर केवळ स्थगित

- काश्मीरच्या मुद्द्यावर द्विपक्षीयच चर्चा होणार

अमेरिकेच्या दाव्याप्रमाणे डीजीएमओमध्ये होणारी चर्चा त्रयस्थ देशात होणार होती... मात्र भारतानं अमेरिकेच्या दबावापुढं न झुकता पाकसोबतच्या चर्चेसाठी हॉटलाईनचा मार्ग स्वीकारलाय..त्यामुळं पाकिस्तानसोबतच्या चर्चेतून काश्मीरचा मुद्दा सुटणार की पुन्हा पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार? हे पाहावं लागेल... मात्र पाकिस्ताननं पुन्हा कुरापत काढल्यास पुन्हा भारताच्या वाटेला जाण्याचं नावही काढलं जाणार नाही, असं उत्तर द्यावं लागेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT