Central Government On Pertol- Diesel Price Saam Tv
देश विदेश

Petrol-Diesel: देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा? PM मोदींच्या आवाहनानंतर केंद्र सरकारने दिली महत्वाची अपडेट

Central Government On Pertol- Diesel Price: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलची बचत करा असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनानंतर देशातील नागरिक चिंतेत आले होते. आता केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट दिली.

Priya More
  • देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवणार आहे का?

  • पीएम मोदींच्या आवाहनानंतर चर्चांना उधाण

  • केंद्र सरकारने पत्रकार परिषद घेत दिली महत्वाची अपडेट

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासह जगाला फटका बसत आहे. या युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील सभेतून देशवासियांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असून पुन्हा दर वाढणार की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण केंद्र सरकारने यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली. सोमवारी केंद्र सरकारने देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी आणि कच्च्या तेलाची कोणतीही कमतरता नाही असे सांगितले.

पीएम मोदी यांनी रविवारी देशातील नागरिकांना आवाहन केले होते की, जगभरात पेट्रोल-डिझेल अत्यंत महाग झाले आहे म्हणूनच इंधनाची बचत करणे गरजेचे आहे. इंधनाची बचत करणे आणि त्याद्वारे पेट्रोल-डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. इंधनाची बचत करा वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मिटिंग सुरू करा, असे देखील त्यांनी आवाहन केले होते.

पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून निर्माण झालेल्या जागतिक चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. पीएम मोदींच्या आवाहनानंतर नागरिक चिंतेत आले होते. सरकारने स्पष्टपणे सांगितले की, देशात कच्चे तेल, पेट्रोल- डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा नाही आणि लोकांनी घाबरून इंधन खरेदी करण्याची गरज नाही.

सरकारने पुढे असे देखील सांगितले की, भारताकडे तेल आणि वायूचा पुरेसा साठा असून सर्व तेल शुद्धीकरण कारखाने पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. जनतेला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकार पुरवठ्यांवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सहसचिव सुजात शर्मा यांनी आज पत्रकार परिषद घेत सांगितले की, भारत सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी आधीच पुरेशी तयारी केली आहे. पीएम मोदी यांचे इंधनाचा मर्यादित आणि विवेकपूर्ण वापर करण्याचे आवाहन केवळ संसाधने वाचवणे आणि परकीय चलन वाचवणे या उद्देशाने होते याचा अर्थ देशात इंधनाचे संकट निर्माण झाले असा होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? राजकीय घडामोडींना वेग

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT