PM नरेंद्र मोदींची विरोधकांवर संविधानाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका
PM मोदींकडून दिल्लीतील द्वारका एक्स्प्रेसवे आणि UER-II प्रकल्पांचे उद्घाटन
खादीबाबत देशाने घेतलेल्या संकल्पामुळे विक्री ७ पट वाढल्याची मोदींकडून माहिती
नवी दिल्ली : आम्हाला जनतेच्या जीवनातील सरकारचा हस्तक्षेप आणि दबाव समाप्त करायचा आहे. मागील सरकारमध्ये दिल्लीच्या सफाई कर्मचाऱ्यांना गुलाम समजायचे. आता डोक्यावर संविधान घेऊन नाचणारे राजकारणी पायदळी तुडवत होते. दिल्लीत एका कायद्यानुसार सफाई कामगार कामावर आला नाही, तर त्याला तुरुंगात डांबलं जात होतं. मी याच प्रकारचे कायदे शोधून रद्द करण्याचं काम करत आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील द्वारका एक्स्प्रेसवे आणि UER-II चं उद्घाटन केलं. हा उद्घाटन सोहळा दिल्लीच्या रोहिणी परिसरात पार पडला. या प्रकल्पांमुळे दिल्लीतील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होईल, असा दावा करण्यात येत आहे. या उद्घाटनानंतर नरेंद्र मोदींनी रोड शो केला. त्यानंतर एका कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात बोलत होते की, 'ऑगस्टचा महिला हा स्वातंत्र्य आणि क्रांतीचं प्रतिक आहे. राजधानी दिल्ली क्रांतीकारक विकासाची साक्षीदार आहे. नव्या रस्त्यामुळे दिल्ली,गुरुग्राम आणि पूर्ण एनसीआरमधील लोकांसाठी वाहतूक व्यवस्था सुलभ होईल. कार्यालय, कारखाने आणि व्यवसायासाठी वाहतूक करणे अधिक सोपे होणार आहे. यामुळे वेळेची बचत होईल. तसेच व्यवसायामुळे शेतकऱ्यांना लाभ होईल.
आर्थिक सुधारणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'दिवाळीच्या आधी जीएसटी बदल केले जातील. यामुळे व्यावसायिक आणि सर्वसामान्यांना मोठा फायदा होईल. यासाठी सर्व राज्यांकडून सहकार्याची अपेक्षा आहे'. यावेळी मोदींनी वोकल फॉर लोकल'चा नारा दिला.
'खादी एकेकाळी नामशेष होण्याच्या मार्गावर होती. परंतु देशाने संकल्प केला. त्यानंतर देशात खादीची विक्री ७ पट वाढलं. मेड इन इंडिया मोबाईल आणि खेळणी मोठ्या प्रमाणात निर्यात वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.