Narendra Modi Saam tv
देश विदेश

Narendra Modi: कोरोना काळात लोकांनी थाळीनाद का केला? PM नरेंद्र मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगितलं कारण

Narendra Modi Latest News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांसहित शिक्षकांशीही संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात नरेंद्र मोदींनी लोकांना थाळीनाद करण्याचं आवाहन का केलं, या मागचं कारणही सांगितलं.

Vishal Gangurde

Narendra Modi News:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीत विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेचं टेन्शन कसं दूर करता येईल, याचं कानमंत्र दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसहित शिक्षकांशीही संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात नरेंद्र मोदींनी लोकांना थाळीनाद करण्याचं आवाहन का केलं, या मागचं कारणही सांगितलं. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'कोरोना काळात मी नागरिकांना थाळीनाद करण्यासाठी सांगितलं होतं. थाळीनाद केल्याने कोरोना नष्ट होणार नव्हता. पण त्याने लोकांमध्ये सामूहिक शक्तीला जन्मास येते'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'लोक खेळाच्या मैदानात जातात. तेव्हा कोणी जिंकतं. तर कोणी जिंकत नाही. आधी याबाबत कोणी विचारत नव्हतं. मात्र मी ठरवलं की, ज्यांच्या जवळ सामर्थ्य आहे, त्यांचा चांगला उपयोग केला पाहिजे. त्याचप्रकारे चांगलं सरकार चालविण्यासाठी सर्व समस्यांचं निराकारण केलं पाहिजे. त्यासाठी चांगलं मार्गदर्शनासाठी व्यवस्थित माहिती आणि मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, 'आपल्यासाठी कोरोना काळ मोठं उदाहरण आहे. मी निराशेची छोटीशी खिडकी देखील उघडी ठेवली नव्हती. तुम्हाला कितीही अडचणी आल्यातरी घाबरलं नाही पाहिजे. त्याचा सामना करून मार्ग काढला पाहिजे'.

'मला माहीत होतं की, थाळीनाद किंवा दिवा पेटवल्याने कोरोनातून सुटका होणार नाही. त्याच्यामुळे कोरोनाचा आजार बरा होणारा नाही. मात्र देशातील लोकांनी एकजूट दाखवावी, यासाठी थाळीनाद आणि दिवा पेटवण्याचं आवाहन केलं होतं. सर्वांनी एकत्र थाळीनाद आणि दिवा पेटवल्याने आपण सर्व एकत्र असल्याची जाणीव झाली.

'जगातील सर्व देश कोरोनाशी लढत होते. तेव्हा मी विचार केला, मी एकटा नाही. देशात १४० कोटी लोक आहेत. सर्व लोक सामना करून या कोरोनाशी सामना करतील. यामुळे सतत टीव्हीवर येत होतो. तसेच लोकांशी संवाद साधत होतो, असंही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro 14 : १८ हजार कोटी मंजूर, बदलापुरातून मेट्रो कधी धावणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली विकासाची ब्लू प्रिंट, वाचा

Mumbai: पदपथ अन् बिल्डिंगच्या टेरेसवर होर्डिंग लावण्यास मनाई, पालिकेकडून नवे जाहिरात धोरण जाहीर; काय आहेत नवे नियम?

Maharashtra Live News Update: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

संतोष बांगरचे महिलांसोबत अनैतिक संबंध, भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

Lado Laksmi Yojana: महिलांसाठी खास योजना! दर महिन्याला मिळतात ₹२१००; लाडो लक्ष्मी योजना आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT