PM Narendra Modi Speech  Saam tv
देश विदेश

PM Narendra Modi Video : ४० कोटी भारतीयांमुळे महासत्ता पराभूत, आज आपण १४० कोटी; दिल्लीतून PM मोदींनी सांगितली पुढची दिशा

PM Narendra Modi speech in delhi : : ४० कोटी भारतीयांमुळे महासत्ता पराभूत झाली. आता आपण १४० कोटी झालो आहोत, असं म्हणत स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्यावरून पंतप्रधान मोदींनी पुढची दिशा सांगितली.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : आज ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी भारताचा ध्वजारोहण केलं. पंतप्रधान मोदींनी सलग ११ व्यांदा झेंडा फडकावला. यावेळी पंतप्रधान मोदींनी २०४७ विकसित भारत फक्त शब्द नसून १४० कोटी देशातील लोकांचं स्वप्न आहे.

पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, 'आज स्वातंत्र्यदिनी देशासाठी लढणाऱ्या लोकांची आठवण काढली पाहिजे. स्वातंत्र्याचा दिवस शेकडो वर्षांची गुलामी आणि संघर्षाचा होता. तरुण, ज्येष्ठ, महिला, आदिवासी, दलितांनी गुलामीविरुद्ध लढा दिला. इतिहास साक्षीदार आहे की, १८५७ सालाआधी देखील स्वातंत्र्यासाठी लढू सुरु होता. गुलामीचा सर्वात मोठा काळ होता. त्यावेळी असलेल्या देशातील ४० कोटी लोकांनी धाडस दाखवलं'.

'आम्ही एक स्वप्न घेऊन पुढे जात आहे. संकल्प घेऊन पुढे जात आहोत. आम्हाला अभिमान आहे की, आमच्या धमन्यात त्यांचं सळसळतं रक्त आहे. ४० कोटी लोकांनी जगातील महासत्तेला धूळ चारली. गुलामीच्या बेड्या तोडल्या. आमच्या पूर्वजांचं रक्त आमच्या धमन्यात आहे. आज आपण १४० कोटी आहोत. त्यावेळी ४० कोटी लोकांनी गुलामीच्या बेड्या तोडल्या. फक्त ४० कोटी लोकांनी स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण केलं. आपण १४० लोकांनी एक संकल्प घेऊन आव्हानांचा सामना केला तर आपण समृद्ध भारत तयार करू शकतो. आपण २०४७ विकसित भारताचं लक्ष्य पूर्ण कर शकतो, असेही मोदी म्हणाले.

विकसित भारतासाठी कठोर परिश्रम सुरु - नरेंद्र मोदी

'विकसित भारत २०४७ हे भाषणाचे शब्द नाहीत. यामागे कठोर परिश्रम सुरु आहे. यासाठी कोट्यवधी लोकांनी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. देशातील लोकांना सूचना मागितल्या. त्यानंतर मोठ्या आपुलकीने विकसित भारत २०४७ साठी सूचना दिल्या. देशातील प्रत्येकाच स्वप्न त्यात प्रतिबिंबित होत आहे. देशातील लोकांचा संकल्प त्यात दिसून येत आहे. तरुण, ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण आणि शहरी लोक, गरीब, श्रीमंत, शेतकरी, आदिवासी आणि महिलांनी विकसित भारतासाठी सूचना दिल्या आहेत. सर्वांच्या सूचना पाहून आनंद झाला, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT