PM Narendra Modi Saam Digital
देश विदेश

Ram Mandir Ayodhya: राम मंदिरावर वक्तव्य करणे टाळा, श्रद्धा दाखवा पण...'; PM मोदींकडून मंत्र्यांना कानमंत्र

Ram Mandir Ayodhya: 'अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरावर कोणतंही वक्तव्ये करणे टाळावीत. तसेच मंत्र्यांनी श्रद्धा दाखवावी, पण आक्रमकता दाखवू नका, असा कानमंत्र पंतप्रधान मोदींनी दिला आहे.

Vishal Gangurde

PM Narendra Modi News:

अयोध्या येथील राम मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारीला संपन्न होणार आहे. 'अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरावर कोणतंही वक्तव्ये करणे टाळावीत. तसेच मंत्र्यांनी श्रद्धा दाखवावी, पण आक्रमकता दाखवू नका, असा कानमंत्र पंतप्रधान मोदींनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांना हा कानमंत्र दिला आहे. (Latest Marathi News)

मीडिया वृत्तानुसार, कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट बैठकीत राम मंदिरावर कोणत्याही प्रकारचे वक्तव्ये करणे टाळण्यास सांगितले आहे. राम मंदिरावर वक्तव्ये करताना मर्यादा लक्षात ठेवण्याचाही सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला आहे.

'राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडत असताना कोणतीही गडबड करू नका. २२ जानेवारीनंतर तुमच्या भागातील लोकांना रामलल्लाचं दर्शन करण्यास घेऊन या, असेही निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तत्पूर्वी, मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने अयोध्या येथील विमानतळाला'महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ' या नावाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अयोध्येतील विमानतळ हे 'आंतरराष्ट्रीय विमानतळ' करण्यास मान्यता देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबरला या विमानतळाचं उद्घाटन केलं होतं.

दरम्यान, . हिंदू धर्मातील महत्त्वाचे महाकाव्य रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी यांचं नाव अयोध्येतील विमानतळाला देण्यात आलं आहे. महर्षी वाल्मिकींनी संस्कृत भाषेत लिहिलेले रामायण सर्वात मानले जाते . महाकाव्याच्या रचनेमुळे महर्षी वाल्मिकी यांना आदिकवी असेही म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS झालेल्या पूजा गुप्ता आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT