PM Narendra Modi  Saam Digital
देश विदेश

Narendra Modi: कलम ३७० पुन्हा लागू करण्याची कुणामध्येही हिंमत नाही; पंतप्रधान मोदी कडाडले

PM Modi on Article 370: कलम ३७० पुन्हा लागू करण्याची कुणामध्येही हिंमत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

PM Narendra Modi on Article 370

कलम ३७० पुन्हा लागू करण्याची कुणामध्येही हिंमत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हिंमत असेल तर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन कलम ३७० लागू करण्याबाबत बोलू दाखवावं, असं चॅलेंज देखील मोदींनी केलं आहे. ते एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. लोकसभेत सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रचारसभा घेऊन मतदारांना वेगवेगळी आश्वासने देखील दिली जात आहेत. अनेक पक्षांनी आपले जाहीरनामे देखील प्रसिद्ध केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांचे पुढचे ध्येय काय आहे? याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. या मुलाखतीवेळी मोदींनी केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवला आहे. तसेच यापुढे देशाचा विकास कसा केला जाईल, यावरही सविस्तर सांगितलं आहे.

लोकांचा वीज आणि वाहतुकीवर होणारा खर्च शून्यावर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यास भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याला आपले प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले.

"कलम ३७० पुन्हा लागू करण्याची कुणातही हिंमत नाही"

तुम्ही कलम ३७० हटवले, तुम्ही CAA आणले. पण, विरोधी नेते त्यांच्या प्रचारात सांगत आहेत, की केंद्रात त्यांचे सरकार आले त्यांच्या प्रचारात त्यांच्या प्रचारात विरोधी पक्षाचे नेते सांगत आहेत की, त्यांचे सरकार स्थापन झाले तर ते CAA रद्द करू. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीएए लागू होऊ देणार नसल्याचे सांगत आहेत. तुम्ही ते कसे पाहता? असा प्रश्न मोदींनी विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, "मी काँग्रेस पक्षाला पत्रकार परिषद आयोजित करण्याचे आव्हान देतो. त्यांनी जाहीरपणे सांगावं, की आमचे सरकार आल्यानंतर कलम ३७० पुन्हा लागू केलं जाईल. पण, असं सांगायचं कुणात धाडस नाही. तसेच कलम ३७० पुन्हा लागू करण्याची कुठल्याही पक्षात हिंमत नाही".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : 'ते' लायटर नव्हे पिस्तूलच! पुण्यातील हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा 'खोटारडेपणा' उघड

Talasari Tourism: मुंबईच्या गोंगाटातून फक्त २ तासांत पोहोचा थेट निसर्गाच्या मिठीत; स्वर्गासारख्या जागेला नक्की भेट द्या

Crime : घराची मालकीण मुलीला चहा देऊन बेशुद्ध करायची, तिचा मुलगा मित्रांसह अत्याचार करायचा; ७ महिन्यांनंतर...

Maharashtra Live News Update : गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार

Rain Alert : पावसाचा तडाखा बसणार; ५ राज्यात होणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात कुठे बरसणार?

SCROLL FOR NEXT