जगभरात चांद्रयान 3 ची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. भारताची चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली आहे. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्याने भारताने जगात मोठा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक क्षणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या टीम, वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. तसेच 'इतिहास घडताना डोळ्यांनी पाहिला,अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आज इतिहास घडताना डोळ्यांनी पाहिला. ऐतिहासिक क्षण पाहून धन्य झालो. हा क्षण अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. हा क्षण १४० कोटी भारतीयांच्या आशेचा आहे. यामुळे नव्या चेतना आणि उर्जेचा आहे. हा क्षण नव्या भारताचा आहे'.
'मी ब्रिक्समध्ये आहे. प्रत्येक भारतीयासारंखं चांद्रयान-३ मोहिमेत गुंतलं होतं. मी खूप आनंदी आहे.प्रत्येक भारतीयांसोबत आनंद साजरा करण्यासाठी उत्सूक आहे. मी सर्व इस्रो, सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. ज्यांनी गेल्या काही वर्षांपासून मेहनत घेतली, त्यांचे आभार. १४० कोटी भारतीयांना कोटी कोटी धन्यवाद, असेही ते म्हणाले.
'आपण जिथं कुणीही गेलं नाही, तिथं आपण गेलो आहे. यापुढे चंद्राविषयीच्या अनेक गोष्टी बदलणार आहे. याचे कारण भारत ठरणार आहे. आपण चंद्राला मामा म्हणतो, 'चंदा मामा बहूत दूर के है, असं म्हणतात.. आता तो दिवस जवळ आले आहे, असेही पुढे म्हणाले.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.