PM Narendra Modi saam tv
देश विदेश

PM Modi News : नरेंद्र मोदींनी ९ वर्षांत किती सुट्ट्या घेतल्या? माहिती अधिकारातून चकीत करणारी माहिती उघड

Political News : 2014 पासून नरेंद्र मोदींनी 3000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PM Narendra Modi :

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रात्रंदिवस काम करणारे नेते आहेत. भाजपचे नेते अनेकदा मोदींचं कौतुक करताना ते सुट्टी न घेता काम करणारे नेते असल्याचा उल्लेख करतात. पण खरंच मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत एकही सुट्टी न घेता काम केलं आहे का? असाच एक प्रश्न माहिती अधिकारातून विचारण्यात आला होता. आरटीआयद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तरही आलं आहे.

यामध्ये पंतप्रधान मोदी पूर्ण वेळ ड्युटीवर असतात का? आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर किती कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते? असे प्रश्न विचारण्यात आले होते. या उत्तरात पीएमओच्या वेबसाईटची लिंक देण्यात आली आहे. (Political News)

2014 पासून नरेंद्र मोदींनी 3000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) आरटीआयद्वारे ही माहिती मागवली होती.  (Latest Marathi News)

माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पीएमओचे अवर सचिव प्रवेश कुमार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून एकही सुट्टी घेतलेली नाही. इतकेच नाही तर गेल्या 9 वर्षात त्यांनी देश-विदेशातील 3000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. (Maharashtra News)

पुण्यातील नागरी हक्क कार्यकर्ते प्रफुल्ल शारदा यांना माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत ड्युटीवर असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे बाणेरमध्ये वाहतूक ठप्प

Nandurbar : नंदुरबारच्या जिल्हाधिकारी महिलेचा प्रेरणादायी निर्णय; जुळ्या मुलांचं सरकारी शाळेत अ‍ॅडमिशन, VIDEO

Cardiac Arrest: कार्डियक अरेस्ट अन् हार्ट अटॅकमध्ये फरक; कोणती लक्षणे दिसतात?

WhatsApp Business Summit: झटपट होईल डील; व्‍हॉट्सअ‍ॅप छोट्या व्यवसायिकांचा वाढवणार बिझनेस

Deepika Padukone: आधी 'स्पिरिट' आता 'कल्की 2'; दीपिका पदुकोणची आणखी एका मोठ्या चित्रपटातून एक्झिट

SCROLL FOR NEXT