Manasvi Choudhary
कॉर्न चीज रोल हा अत्यंत चविष्ट पदार्थ आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातात
कॉर्न चीज रोल घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सहजरित्या बनवू शकता.
कॉर्न चीज रोल बनवण्यासाठी मक्याचे दाणे, बटाटे, चीज, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चिली प्लेक्स, मीठ, काळी मिरी पावडर, ब्रेड स्लाईस हे साहित्य एकत्र करा.
एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करा त्यात उकडलेले मक्याचे दाणे, चीज, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि सर्व मसाले मिक्स करा
या संपूर्ण मिश्रणाचे छोटे लांबट आकाराचे रोल्स तयार करून ठेवा.
तयार रोल कॉर्नफ्लोरमध्ये मिक्स करून ब्रेड क्रम्ब्स मध्ये मिक्स करा. अशाप्रकारे कुरकुरीत टेक्सचर रोलला येईल.
गॅसवर कढईत तेल चांगले गरम करा. हे रोल्स मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.