Shruti Vilas Kadam
पार्टीदरम्यान मोबाइलची बॅटरी संपू नये म्हणून छोटा पॉवर बँक सोबत असणे फायदेशीर ठरते.
खाणं-पिणं झाल्यानंतर लिपस्टिक फिकट होते. लुक फ्रेश ठेवण्यासाठी आवडती लिपस्टिक किंवा ओठांना ओलावा देणारा लिप बाम बॅगेत असायलाच हवा.
घाम किंवा ऑईलमुळे चेहरा चमकू नये यासाठी कॉम्पॅक्ट पावडर किंवा ब्लॉटिंग पेपर खूप उपयोगी पडतात. मेकअप टच-अपसाठी हे आवश्यक आहे.
पार्टीत फ्रेश आणि आत्मविश्वासपूर्ण वाटण्यासाठी सौम्य सुगंधाचा परफ्युम किंवा बॉडी मिस्ट जवळ ठेवा.
स्वच्छतेसाठी हँड सॅनिटायझर आणि टिश्यू पेपर अत्यंत महत्त्वाचे असतात, विशेषतः बाहेरच्या ठिकाणी पार्टी असल्यास.
ड्रायव्हिंग लायसन्स किंवा ID कार्ड आणि थोडे कॅश पैसे बॅगेत असणे आवश्यक आहे. कधी कधी ऑनलाइन पेमेंट काम करत नाही, तेव्हा रोख उपयोगी पडते.
ड्रेसची छोटी अडचण किंवा केस सावरायला सेफ्टी पिन आणि हेअर क्लिप खूप मदतीच्या ठरतात. ही छोटी वस्तू अनेकदा मोठा त्रास वाचवते.