New Year Couples Resolution: २०२६ पार्टनरसोबत न भांडता घालवायचं आहे? नवीन वर्षी जोडीदारासोबत करा हे प्रॉमिस

Shruti Vilas Kadam

एकमेकांना ऐकण्याचे वचन

2026 मध्ये मोबाइल बाजूला ठेवून पार्टनरच्या भावना आणि विचार लक्षात घेऊन ऐकण्याचे वचन द्या. हे वचन संवाद सुधारायला मदत करेल आणि गैरसमज टाळेल.

couples | Saam tv

वेळ देण्याचे वचन

आपल्या नात्याला मजबुती देण्यासाठी रोज थोडा क्वालिटी टाइम एकत्र घालवण्याचे ठरवा. हफ्त्यातून एक दिवस फक्त एकमेकांसाठी राखून ठेवा.

couples

राग नियंत्रित ठेवण्याचे वचन

यंदा वाद–विवादात अपशब्द वापरने टाळा आणि जुनी गुढ मुद्दे उघडून न काढण्याचे ठरवा. यामुळे नात्यातल्या छोट्या–मोठ्या तणावांपासून दूर राहता येईल.

couples

एकमेकांची कदर आणि कौतुक करण्याचे वचन

कोणत्याही तुलनेपेक्षा आपल्या पार्टनरची खरी कदर करा. त्यांचे छोटेसे प्रयत्न आणि योगदान ओळखा आणि त्यांना नेहमी कौतुकाचा अनुभव द्या.

couples

समजूतदारपणाचे वचन

आपल्या पार्टनरच्या भावना, ध्येय आणि आवड–निवडींना योग्य मान देण्याचे वचन द्या. हे नात्याला अधिक खुला आणि विश्वासू बनवेल.

couples | Saam Tv

एकत्र ध्येय साध्य करण्याचे वचन

यंदा आपल्या जीवनातील महत्त्वाच्या ध्येयांसाठी एकत्र प्रयत्न करण्याचे ठरवा. करिअर असो वा वैयक्तिक स्वप्न, दोघांनी एकमेकांना साथ देणे आवश्यक आहे.

Couples

संवाद वाढवण्याचे वचन

दररोज उघडपणे आणि प्रामाणिकपणे चर्चा करण्याचे वचन द्या जेणेकरून लहान–मोठ्या समस्या उद्भवण्याआधीच आपण त्यावर उपाय शोधू शकता.

Couples

हिवाळ्यात दररोज दोन वेलची खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Elaichi Benefits
येथे क्लिक करा