Shruti Vilas Kadam
हिवाळ्यात बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या तक्रारी वाढतात. दररोज दोन वेलची खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि गॅस, आम्लपित्त कमी होण्यास मदत होते.
वेलचीमध्ये उष्ण गुणधर्म असल्याने सर्दी, खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यास मदत होते. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते.
हिवाळ्यात शरीर थंड पडते. वेलची खाल्ल्याने शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण होते आणि थंडीचा त्रास कमी होतो.
वेलची चघळल्याने तोंड स्वच्छ राहते, दुर्गंधी दूर होते आणि श्वास ताजा राहतो.
वेलची मेटाबॉलिझम वाढवते. त्यामुळे हिवाळ्यात वाढणारे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
वेलचीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
वेलचीचा सुगंध आणि गुणधर्म मानसिक तणाव कमी करतात, थकवा दूर करतात आणि मन प्रसन्न ठेवण्यास मदत करतात.