Abhijit Pawar Meets Narendra Modi  Saam Tv
देश विदेश

Narendra Modi Exclusive : अभिजित पवार यांनी PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; देशभरासह महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

Abhijit Pawar Meets Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक तसेच सकाळ माध्यम समूहाचे व्यस्थापकीय संचालक अभिजित पवार यांची नवी दिल्लीत भेट झाली.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 'एपी ग्लोबाले'चे संस्थापक तसेच सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांची नवी दिल्लीत भेट झाली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेतील काही प्रमुख मुद्दे...

अभिजित पवार: ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलंय. विरोधकांच्या टीकेमुळे बराच वाद झाला. त्यावर तुमचं मत काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी: ईव्हीएमच्या मुद्यावरून वारंवार बिनबुडाचे आरोप करून लोकशाहीला पायदळी तुडवण्याच्या इंडिया आघाडीच्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने खीळ बसली आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, त्यांचं खच्चीकरण करायचं हीच काँग्रेसची वृत्ती आहे. पूर्वी ही मंडळी बूथ कॅप्चर करायची. बोगस मतदानाच्या आधारे गरीब, एससी, एसटी, ओबीसी, महिलांचा आवाज दाबला जात होता. त्या दिवसाची ते वाट पाहताहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून माझे आणि आमच्या नेत्यांचे खोटे व्हिडिओ विरोधी पक्ष बनवत आहेत. आमच्याविरूद्ध जिंकण्याची संधी नसल्यामुळे ते असे लाजीरवाणे डावपेच आखत आहेत.

अभिजित पवार: निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत, तुमच्या दृष्टीकोनातून भाजपची कामगिरी कशी झाली आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी: आम्हाला केवळ विकास आणि विकासच हवा आहे. मतपेटीचं राजकारण, भ्रष्टाचार, अस्थिरता ही इंडिया आघाडीची तत्वे आहेत. जनतेला हे अजिबात नकोय. 60 वर्षांत काँग्रेसला काहीच करता आलं नाही. लोकांचा आमच्यावर विश्वास वाढलाय. निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांत मला शुभसंकेत मिळाले आहेत.

अभिजित पवार: राज्यातील तुमच्या सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापनं कसं कराल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी: एकनाथ शिंदेंनी आव्हानात्मक परिस्थितीत सत्ता स्वीकारली. मविआच्या काळातील धोरण लकवा दूर करायचा होता. आधीच्या सरकारमुळे लोक अत्यंत त्रासले होते, अस्वस्थ होते. मविआचा जो प्रयोग झाला, त्याला जनादेशाचा आधार नव्हता. आपसांतील वादामुळेच आघाडी कोसळली. आमचं सरकार आल्यानं कामाला गती मिळाली. फायलींमध्ये धूळ खात पडलेले प्रकल्प मार्गी लागले. नियोजनबद्ध आणि पारदर्शक काम सुरू आहे. शिंदेच्या नेतृत्वात सरकारची देदीप्यमान कामगिरी दिसून येते.

अभिजित पवार: मविआमुळे एनडीएसमोर आव्हान निर्माण झालंय का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी : मविआ ही विसंगत आघाडी आहे. बाळासाहेबांनी एकेकाळी त्यांच्यावर टीका केली होती. याच लोकांनी त्यांना धोका दिला होता. आता हेच लोक त्यांच्याबरोबर आघाडीत एकत्र आहेत. आघाडीकडून सर्व मूल्य पायदळी तुडवली जाताहेत. मविआपासून आम्हाला धोका आहे, असं मला वाटत नाही.

अभिजित पवार : यंदाच्या निवडणुकीत वारसा कर हा शब्द गाजतोय. महाराष्ट्रातही याबाबत चर्चा आहे. तुमची भूमिका काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी : ही अत्यंत धोकादायक योजना आहे. वारसा म्हणून आलेल्या संपत्तीवर त्यांना वारसा कर लावून डल्ला मारायचाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kamali: कमळी मालिकेत नवा ट्विस्ट; थिएटरमध्ये कमळीची छेड काढल्यामुळे ऋषीचा संताप अनावर, दोघांच्या नात्याला मिळणार नये वळण

Voter List Scam: महाराष्ट्र, कर्नाटकानंतर केरळातही घोळ; एकाच पत्त्यावर ९ जणांची बनावट मतदार नोंदणी

Maharashtra Live News Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सरीना सुरूवात

Cabinate Decision: रेशन दुकानदारांना आता क्विंटलमागे १७० रुपये मार्जिन; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, पाहा, VIDEO

Voter List Scam : दोनच मतदार असताना एकाच घरात दाखवले ११९ मतदार; चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीतील घोटाळा उघड

SCROLL FOR NEXT