पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चांद्रयान मोहिम ते जी- २० परिषदेच्या यशाबद्दल देशवासियांना माहिती दिली. पंतप्रधान मोदींच्या मन की बातचा हा १०७ वा भाग होता. तसेच देशवासियांना त्यांनी 'चांद्रयान-3 महाक्विझ मध्ये सहभागी होण्याचे आवाहनही केली.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात'च्या 105 व्या भागात संबोधित केले. यावेळी त्यांनी 'मन की बात'च्या आणखी एका एपिसोडमध्ये मला तुमच्यासोबत देशाचे यश, देशवासियांचे यश आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा प्रवास सांगण्याची संधी मिळाली आहे, असे म्हणत विविध विषयांवर भाष्य केले.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मला आजकाल मिळालेली पत्रे आणि संदेश दोन विषयांवर आहेत. पहिला विषय म्हणजे चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग आणि दुसरा विषय दिल्लीतील G-20 परिषदेचे यशस्वी आयोजन. मला सर्व वयोगटातील, देशातील प्रत्येक भागातून, समाजातील प्रत्येक घटकाकडून अगणित पत्रे मिळाली आहेत."
चांद्रयान मोहिमेमध्ये सर्वांचा सहभाग....
पंतप्रधान म्हणाले की, चांद्रयान-३ चे लँडर चंद्रावर उतरणार होते, तेव्हा कोट्यवधी लोक वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक क्षणाला या घटनेचे साक्षीदार होते. इस्रोच्या यूट्यूब लाईव्ह चॅनलवर 80 लाखांहून अधिक लोकांनी हा क्षण पाहिला, हा एक विक्रम आहे. यावरून कोट्यवधी भारतीयांचे चांद्रयान-३ बद्दल किती अतूट नाते आहे हे दिसून येते.
मन की बातच्या 105 व्या भागाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी चांद्रयानच्या यशाबद्दल सध्या सुरू असलेल्या 'चांद्रयान-3 महाक्विझ' या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा उल्लेख केला. सरकारकडून आयोजित या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे. असे म्हणत प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांसाठी आयोजित केलेल्या 'G20 University Connect Programme या कार्यक्रमाची माहिती दिली. या माध्यमातून देशभरातील लाखो विद्यापीठातील विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. यामध्ये आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालयांसह अनेक प्रतिष्ठित संस्था सहभागी होणार आहेत. 26 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.