मी आताही सत्तेत नाही आणि भविष्यात पण सत्तेत राहायची इच्छा नाही - नरेंद्र मोदी  Saam TV
देश विदेश

मी आताही सत्तेत नाही आणि भविष्यात पण सत्तेत राहायची इच्छा नाही - नरेंद्र मोदी

मला जनतेच्या सेवेत राहायचे आहे. आता देखील मी जनतेच्या सेवेत आहे. पंतप्रधान पद हे सत्ता म्हणून माझ्यासाठी महत्वाचे नाही. मी एक जनतेचा सेवक आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 'मन की बात' च्या 83 व्या आवृत्तीमध्ये देशाला संबोधित केले.यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, डिसेंबरमध्ये नौदल दिन आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करणार आहे. तर 16 डिसेंबर हे 1971 च्या युद्धाचे संस्मरणीय जयंती वर्ष आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'अमृत महोत्सव शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो. आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यातील योगदान लक्षात घेऊन देशानेही आदिवासी गौरव सप्ताह साजरा केला आहे. देशाच्या विविध भागात यासंबंधीचे कार्यक्रमही झाले. अंदमान आणि निकोबार बेटांवर, जरावा आणि ओंगे सारख्या आदिवासी समुदायांच्या लोकांनी त्यांच्या संस्कृतीचे थेट प्रदर्शन केले.

हे देखील पहा -

पीएम मोदी पुढे म्हणाले, 'आपल्या देशात अनेक राज्ये आहेत, अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे लोकांनी त्यांच्या नैसर्गिक वारशाचे रंग जपले आहेत. निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची जीवनशैली या लोकांनी आजही जिवंत ठेवली आहे. आपल्या सर्वांसाठीही ही प्रेरणा आहे. मेघालयातील एका उडत्या बोटीचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नदीचे पाणी इतके स्पष्ट आहे की आपल्याला तिचा पायथ्याचा भाग दिसतो. आपल्या आजूबाजूला जी काही नैसर्गिक संसाधने आहेत, ती आपण वाचवली पाहिजेत. त्यांनी पुन्हा त्यांचे खरे रूप परत केले पाहिजे असे यावेळी म्हणले.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राजेश कुमार प्रजापती या व्यक्तीवर उपचार करण्यात आले. त्याबाबत राजेश कुमार प्रजापती यांनी मोदींचे आभार मानले. तसेच त्यांना सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मोदी म्हणाले, ''मला सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा देऊ नका. मी आताही सत्तेत नाही आणि भविष्यात पण सत्तेत राहायची इच्छा नाही. कारण मला जनतेच्या सेवेत राहायचे आहे. आता देखील मी जनतेच्या सेवेत आहे. पंतप्रधान पद हे सत्ता म्हणून माझ्यासाठी महत्वाचे नाही. मी एक जनतेचा सेवक आहे.तसेच यावेळी त्यांनी आयुष्मान भारत योजनेचे महत्व जनतेला सांगितले. प्रत्येकाने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्ड बनवायला पाहिजे असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : नागपुरात अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच महासत्संग आयोजन

Mumbai Tourism : पाऊस, समुद्रकिनारा अन् गरम चहा; मुंबईतील 'हे' प्रसिद्ध ठिकाण, जेथे असते दिवसरात्र गर्दी

Thackeray Brothers : ठाकरेंचं ठरलं का? दसरा मेळाव्यात युतीचं तोरण बांधणार का? शिवाजी पार्कवर राज ठाकरे विचारांचं सोनं लुटणार का?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

SCROLL FOR NEXT