PM Modi Warns Paper Leak Mafia साम टीव्ही मराठी
देश विदेश

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

PM Modi Warns Paper Leak Mafia : संसदेच्या दोन्ही सभागृहांत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक २०२६ मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर लीक माफियांना कडक इशारा दिला आहे.

Namdeo Kumbhar

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये (लोकसभा आणि राज्यसभा) 'सार्वजनिक परीक्षा संशोधन विधेयक' पारित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ मेसेज जारी केला आहे. यात त्यांनी देशभरातील पेपर लीक माफिया आणि घोटाळेबाजांना स्पष्ट इशारा दिला आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या एकाही दोषीला सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

पेपर लीक प्रकरणातील माफियांना आणि दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. केंद्र सरकार देशातील तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करत असून, स्पर्धा परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी नवीन व कडक कायदे लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी या व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटले आहे. गुरूवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

लोकसभेनंतर हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले.

संसदेने गुरुवारी सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ ला मंजुरी दिली. विरोधी पक्षांनी सभात्याग केला असताना हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. लोकसभेने बुधवारी हे विधेयक मंजूर केले होते. ज्यामध्ये पेपरफुटीसह परीक्षेतील अनियमिततांचा जलद तपास आणि खटला चालवण्याची, तसेच कठोर शिक्षेची तरतूद आहे.

आता फक्त राष्ट्रपतींची संमती बाकी आहे. नंतर, जेव्हा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी विधेयक सादर करून त्यातील तरतुदींचा तपशील दिला, तेव्हा विरोधी पक्षाचे खासदार आपापल्या जागेवरून घोषणाबाजी आणि टीका-टिप्पणी करू लागले. जितेंद्र सिंह म्हणाले, "कदाचित बाण अचूक लागला आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

Gadchiroli Flood: गडचिरोलीत पावसाचा कहर; २५ प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

SCROLL FOR NEXT