Narendra Modi  saam tv
देश विदेश

PM Modi| देशासाठी मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचा अभिमान; नरेंद्र मोदींकडून खेळाडूंचं कौतुक

'मला देशासाठी पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंचा अभिमान वाटत आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी खेळाडूंचे कौतुक केलं आहे.

Vishal Gangurde

PM Narendra Modi News : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी पदकं जिंकली आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. 'मला देशासाठी पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंचा अभिमान वाटत आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी खेळाडूंचे कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर आणि अन्य मंत्री देखील उपस्थित होते. नरेंद्र मोदी म्हणाले, 'गेल्या काही आठवड्यात भारताने खेळाच्या मैदानात दोन मोठ्या कामगिरी केल्या आहेत. देशातील पदके जिंकणाऱ्या खेळाडूंचा अभिमान आहे. तर भारताच्या महिला खेळाडूंनी बॉक्सिंग-जुडो-कुस्तीमध्ये जे खेळाचे चांगले प्रदर्शन दाखवले आहे, ते आश्चर्यकारक वाटले'.

'तुम्ही सर्व देशासाठी केवळ एक पदक देत नाही, आनंद व्यक्त करणे आणि अभिमान व्यक्त करण्याची संधी देतात. तुम्ही खेळातच नाही, तर तुमच्याकडून विविध क्षेत्रातील देशातील युवकांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यात तिरंगा ध्वजाची ताकद काय आहे, हे आपण महिन्यांपूर्वी युक्रेनमध्ये पाहिले आहे. युद्धाच्या वेळी भारतीयांना आणि इतर देशांच्या लोकांनी युद्धाच्या भूमीतून बाहेर पडण्यासाठी तिरंगा ध्वज संरक्षणाची ढाल म्हणून वापरली, असे मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Exit Polls of Maharashtra : शेकापच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण चालणार? पाहा एक्झिट पोल

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT