Surat Diamond Bourse Saam Digital
देश विदेश

Surat Diamond Bourse: PM नरेंद्र मोदींनी गुजरातला दिली मोठी भेट; 'सुरत डायमंड बोर्स', विमानतळ टर्मिनलचं उद्घाटन

Surat Diamond Bourse: अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटागॉन कार्यालयापेक्षाही मोठ्या आणि जगातील सर्वात मोठ्या हिरे आणि दागिन्यांच्या व्यापाराचे केंद्र असलेल्या 'सुरत डायमंड बोर्स'चे आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Sandeep Gawade

Surat Diamond Bourse

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातला दोन मोठ्या भेटवस्तू दिल्या आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटागॉन कार्यालयापेक्षाही मोठ्या आणि जगातील सर्वात मोठ्या हिरे आणि दागिन्यांच्या व्यापाराचे केंद्र असलेल्या 'सुरत डायमंड बोर्स'चे आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे लाकार्पणही यावेळी करण्यात आले. या उद्घाटनाला मोठ्या संख्येने देश विदेशातील लोक उपस्थित होते.

तब्बल ४२०० हिरे आणि सोने व्यावसायिकांनी एकत्र येत जागतिक दर्जाचा हा प्रकल्प साकारला आहे. उद्घाटनानंतर सुरतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. रोड शोत मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. १६० कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या सुरत विमानतळाच्या इमारतीचेही मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या विमानतळाला केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिरे आणि दागिन्यांच्या व्यापरासाठी सुरत डायमंड बोर्स हे आंतरराष्ट्रीय जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असेल. तर सुरत विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत १२०० देशांतर्गत प्रवाशी आणि ६०० आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हाताळण्यास सक्षम असणार आहे. अधिक रहदारीच्यावेळी याची क्षमता ३००० प्रवाशांपर्यंत वाढवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rutuja Bagwe Photos: हाय गर्मी! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फोटोशुटने वातावरण तापवलं...

Dhurandhar 2 : 'धुरंधर २' ने रचला इतिहास; भारतात १००० कोटी कमावणारा पहिला चित्रपट, तिसऱ्या रविवारी छप्परफाड कमाई

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत मोठी खेळी;बलाढ्य नेत्याची पोटनिवडणुकीतून माघार

Shubh Muhurat April 2026: लवकरच संपणार खरमास, सुरु होणार लग्नाची धामधूम, वाचा एप्रिल महिन्यातल्या शुभ मुहूर्ताची संपूर्ण यादी

Maharashtra News Live Update: अजितदादाचं निवडणूक लढवत आहे, असं समजा... सुनेत्राकाकीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT