PM Narendra Modi Speech ANI
देश विदेश

PM Narendra Modi Speech : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना याच्या पेक्षा मोठी श्रद्धांजली काय असेल; निवडणुकांच्या निकालावर PM मोदी काय म्हणाले? VIDEO

PM Narendra Modi on haryana and j&k election result : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : हरियाणा भाजपला मोठं यश प्राप्त झालं आहे. हरियाणात भाजपला बहुमत प्राप्त झालं आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मतदारांचे आभार मानले. यावेळी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार घणाघात केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे

आज हरियाणात कमळ-कमळ झालं आहे. आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. या पावन दिवसाला हरियाणा तिसऱ्यांदा कमळ फुललं आहे. गीताच्या धरतीवर सत्याचा विजय झाला आहे. प्रत्येक जाती-वर्गाच्या लोकांनी आम्हाला मत दिलं. जम्मू-काश्मीरमध्ये दशकानंतर शांतीपूर्वक मतदान झालं आहे. हा भारताचा विजय आहे. हा भारताच्या लोकशाहीचा विजय आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तेथील लोकांनी नॅशनल कॉन्फरन्सला अधिक जागा दिल्या आहेत. तेथे जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. मी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या जनतेचं अभिनंदन करतो. मी सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीला नमन करतो. हरियाणामधील विजय हा भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे झाला आहे. हरियाणाचा विजय हा तेथील विनम्र मुख्यमंत्र्यांमुळे झाला आहे. हरियाणाच्या जनतेने नवा इतिहास रचला आहे. हरियाणाची स्थापना १९९६ मध्ये झाली. तेथे अनेक बड्या नेत्यांनी हरियाणाचं नेतृत्व केलं. हरियाणाचे दिग्गज नेत्यांचे नाव देशभर गाजायचे.

हरियाणा १३ निवडणूक झाल्या. हरियाणात प्रत्येक पाच वर्षांनंतर सत्ता बदलली. मात्र, यंदा पहिल्यांदा पाच वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पक्षाला सत्ता दिली आहे. हरियाणाच्या जनतेने भाजपला तिसऱ्यांदा सत्ता दिली. त्यांनी जागा आणि मतदानही जास्त केलं. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहेच, तसेच अनेकांच्या मनातील पक्ष आहे.

'विकासाच्या कामावर भाजपचा तिसऱ्यांदा विजय'

हरियाणात जनतेच्या विकासाच्या कामावर भाजपने हॅट्ट्रिक मारली आहे. उत्तर प्रदेशातील लोक भाजपला वारंवार संधी देत आहे. अनेक राज्यात लोक भाजपला संधी देत आहेत. देशातील अनेक राज्यातील लोक भाजपला संधी देत आहेत. तुम्ही काँग्रेसची अवस्था पाहू शकता. कोणत्या राज्यात काँग्रेसची वापसी झाली आहे का? लोकांनी काँग्रेसला दुसऱ्यांदा संधी दिलेली नाही. देशातील काही राज्यात ५०-६० वर्षे काँग्रेसची सत्ता होती. आता त्या राज्यात काँग्रेस कुठेच नाही. आता काँग्रेसची पोलखोल झाली आहे. काँग्रेसचा डब्बा गुल झाला आहे. काँग्रेस सत्तेला जन्मसिद्ध हक्क मानत होती. आज संपूर्ण देश पाहतोय की, काँग्रेस जातीचं विष पसरवत आहे.

काँग्रेसने दलित आणि मागासवर्गीयांवर अन्याय केला. काँग्रेसने विकासापासून वंचित ठेवलं. काँग्रेस कधीच दलित-आदिवासींना पंतप्रधान होऊ देणार नाही. काँग्रेस दलित,मागासवर्गीय, आदिवासी वरिष्ठ पदावर गेल्यावर यांच्या पोटात दुखायला लागतं. काँग्रेसच्या शाही कुटुंबाने सांगितलं की, आरक्षण रद्द करणार आहे. काँग्रेस आरक्षण रद्द करून त्यांच्या व्होटबँकेला देईल. काँग्रेस अनेक वर्गाला भडकावत आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांना फसवत आहेत. हरियाणाच्या शेतकऱ्यांनी काँग्रेसला उत्तर दिलं आहे. काँग्रेसकडून दलित, मागासवर्गीयांना भडकवण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी सैन्यदलाविषयी चुकीचा अपप्रचार केला. देशविरोधी राजकारण चालणार नाही.

भारतीय लोकशाहीला कमकुवत करण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. देशभक्त हरियाणा काँग्रेसच्या षडयंत्राला बळी पडला नाही. आजच्या निकालाने स्पष्ट केली आहे की, काँग्रेस परिजीवी पक्ष झाला आहे. लोकसभा निवडणुकीत देखील असं पाहायला मिळालं. सहकारी पक्षामुळे काँग्रेस जिंकली आहे. अनेक राज्यात काँग्रेसच्या कामगिरीमुळे त्यांच्या मित्र पक्षांना फटका बसला. काँग्रेस मित्र पक्षांना गिळण्याचं काम करते. काँग्रेस सर्व यंत्रणांना बदनाम करत आहे.

जम्मू-काश्मीरमधील निवडणूक ऐतिहासिक ठरली. जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण संविधान लागू झाल्यानंतर निवडणूक झाली. अनेकांना मतदानाचा अधिकार मिळाला. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर बहरलं आहे. काश्मीर कर्फ्य्यू , फुटीरत्यावाद्यापासून दूर जात आहे. १९४७ नंतर पहिल्यांदा प्रशासनाच्या सर्व स्तरावर जनतेने निवडलेले प्रतिनिधी काम करतील. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा संविधानाची पुनः प्रतिष्ठापना केली आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना याच्या पेक्षा मोठी श्रद्धांजली काय असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडणून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

Prajakta Mali : 'फुलवंती'ची OTT वर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; चक्क हॉलिवूडला टाकलं मागे, प्राजक्ता माळीने चाहत्यांचे मानले आभार

Maharashtra Exit Poll: संगरनेरमध्ये बाळासाहेब थोरात होणार आमदार? VIDEO

Maharashtra Exit Poll: चोपडा मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT