Queen Elizabeth Death PM Narendra Modi Tweet Saam TV
देश विदेश

Queen Elizabeth Death : राणी एलिझाबेथ यांच्या निधनाने PM मोदी गहिवरले, ट्विट करत म्हणाले...

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वृद्धापकाळाने निधन झालं.

साम टिव्ही ब्युरो

Britain Queen Elizabeth Death : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शाही राजघराण्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राणी एलिझाबेथ यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले. दरम्यान, एलिझाबेथ यांच्या निधनानंतर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट करत एलिझाबेथ यांच्या आठवणींना उजाळा दिलाय.

'२०१५ आणि २०१८ साली युक्रेन दौऱ्यावर असताना माझी महाराणी एलिझाबेथ यांच्यासोबत भेट झाली होती. मी त्यांचा प्रेमळपणा आणि दयाळूपणा कधीच विसरणार नाही. एका भेटीत महाराणी एलिझाबेथ यांनी मला, महात्मा गांधी यांनी त्यांना दिलेला रूमाल दाखवला होता. त्या नेहमी आठवणीत राहतील' अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

राणी एलिझाबेथ यांची कारकीर्द

महाराणी एलिझाबेथ यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ साली लंडनमध्ये झाला होता. २० नोव्हेंबर १९४७ साली त्यांनी ग्रीक आणि डेन्माक्रचे राजकुमार प्रिन्स फिलिप यांच्याशी त्यांचा विवाह केला. नोव्हेंबर १९४८ साली त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाचे नाव प्रिन्स चार्ल्स ठेवण्यात आले. ६ फेब्रुवारी १९५२ साली वडिलांच्या मृत्युनंतर त्या एलिझाबेथ महाराणी झाल्या.

२ जून १९५३ रोजी एलिझाबेथ यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांना राणीचा मुकट घालण्यात आला. ६ फेब्रुवारी २०१२ रोजी एलिझाबेथ यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केली. या दिवशी त्यांचा हिरक महोत्सव साजरा करण्यात आला. ९ सप्टेंबर २०१५ साली इंग्लंडवर सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या एलिझाबेथ पहिल्या महिला सम्राज्ञी ठरल्या. ९ एप्रिल २०२० रोजी त्यांचे पती पिन्स विल्यम्स यांचे निधन झाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

SCROLL FOR NEXT