Rahul Gandhi Vs Narendra Modi Saam Tv
देश विदेश

Narendra Modi News : चहा विकणारा तीनदा पंतप्रधान झालाय म्हणून काँग्रेसवाले गोंधळून गेलेत : नरेंद्र मोदी

NDA Parliamentary Meeting : चहा विकणारा तीनदा पंतप्रधान झाला आहे म्हणून काँग्रेसवाले गोंधळून गेले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

Satish Daud

चहा विकणारा तीनदा पंतप्रधान झाला आहे म्हणून काँग्रेसवाले गोंधळून गेले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. राहुल गांधी यांनी संसदेत केलेलं वर्तन अतिशय चुकीचं असून तुम्ही त्यांच्यासारखं वागू नका. चांगले आचरण ठेवा, असा सल्लाही मोदींनी आपल्या खासदारांना दिला. संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी दिल्लीत एनडीएच्या संसदीय पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत मोदी बोलत होते.

सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) सुरू आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय. सोमवारी अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत भगवान महादेवाचं चित्र दाखवलं. त्रिशूळ हे हिंसेचं नसून अहिंसेचं प्रतीक आहे असं राहुल गांधींनी सांगितलं.

त्याचबरोबर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुनानक यांचंही चित्र दाखवलं. त्यांच्या या कृतीवर भाजप खासदारांनी आक्षेप घेतला. भगवान महादेव आणि गुरुनानक हे 'डरो मत' असं सांगतात.. पण स्वत:ला हिंदू म्हणवणारे देशात हिंसा पसरवतात असा टोला राहुल गांधींनी भाजपला लगावला. यावरून सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

दरम्यान, याच गोष्टीचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एनडीएतील खासदारांना काही महत्वाच्या सूचना केल्या. खासदारांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, तुम्ही सर्व लोकांनी संसदेत चांगलं वागलं पाहिजे. एक चहा विकणारा तिस-यांदा पंतप्रधान कसा झाला, याबद्दल काँग्रेसवाले गोंधळून गेले आहेत.

"राहुल गांधी यांचे संसदेतील वर्तन चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी एनडीएच्या खासदारांना त्यांच्यासारखे वागू नका, चांगले आचरण ठेवा, अशा सूचनाही केल्या. संसदेत कोणत्याही विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करा. त्यावर सविस्तर बोला, असं आवाहनही मोदींनी एनडीएमधील खासदारांना केलं.

दरम्यान, राहुल गांधी यांनी संसदेत मांडलेल्या काही मुद्द्यांचा भाग पटलावरून काढून टाकण्यात आला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. भाजप सत्य लपवण्याचा प्रयत्न करतंय. पण रेकॉर्डवरून काही मुद्दे काढून टाकले, तरीही सत्य काढून टाकता येणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Kranti Redkar: '... आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली'; क्रांती रेडकरने सांगितली छबिल-गोदोच्या जन्माची खास आठवण

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT