PM Narendra Modi Latest News Saam TV
देश विदेश

PM Narendra Modi : 'महात्मा गांधींच्या 3 माकडांसारखं...'; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर निशाणा

Vishal Gangurde

PM Narendra Modi Latest Speech :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी डोळे, कान, नाक , तोंड हे महात्मा गांधींच्या तीन माकडांसारखं बंद केले आहेत, असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला. (Latest Marathi News)

पश्चिम बंगालमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'टीएमसीने पश्चिम बंगालमध्ये अत्याचार आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिलं आहे. पश्चिम बंगालमधील स्थिती संपूर्ण देश पाहत आहेत. 'माँ,माटी , मानुष' चा संदेश देणाऱ्या बहिणीने लोकांसोबत जे केलं, ते पाहून देश दुखी आहे'.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, 'माता आणि भगिनींसोबत झालं, त्याचा बदला तुम्ही घेणार आहात का? बंगालची जनता ममता दीदींना सवाल करत आहे. काही लोकांची मते ममता दीदींना महिला वर्गापेक्षा महत्वाची आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी महत्मा गांधी यांच्या तीन माकडांसारखे डोळे, नाक, कान , तोंड केले आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीएमसीच्या कारभारावर पंतप्रधान मोदींची टीका

'इंडिया आघाडीचे नेते भ्रष्टाचारी, घराणेशाही, ध्रुवीकरणाला प्रोत्साहन देणारे आहेत. टीएमसी पश्चिम बंगालमध्ये अत्याचाराचं नव मॉडेल तयार करत आहेत. टीएमसीने प्राथमिक शिक्षक घोटाळा केला. म्युनिसिपालिटी भरती घोटाळा केला. गरीब लोकांच्या रेशन योजनेतही घोटाळा केला, असा आरोप पंतप्रधान मोदींना केला.

'गरिबांच्या जमीनीवर बळजबरीने सीमेवर प्राण्यांची तस्करी असेल. तर टीएमसीने भ्रष्टाचाराचं कोणतही क्षेत्र सोडलं नाही. टीएमसी मंत्र्यांच्या घरातून नोटांचं बंडल मिळाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना रोखलं जात आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

Mumbai News : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

Viral News: शाब्बास पठ्ठ्यांनो! कपडे शिलाईसाठी तरुणांचा हटके जुगाड, थेट बाईकचा वापर करुन काम केलं सोपं; पाहा VIDEO

High Court News: विवाहित महिला लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप करु शकत नाही: हायकोर्ट

Surya Grahan 2024: २ ऑक्टोबरपासून 'या' राशींच्या आयुष्यावर लागणार ग्रहण; 'या' राशींवर घोंगावणार संकट

SCROLL FOR NEXT