PM Narendra Modi criticizes Congress in Odisha Sabha Saam TV
देश विदेश

Narendra Modi: गांधी घराण्याच्या ४ पिढ्यांनी भारतीय संविधानाचा अपमान केला; पंतप्रधान मोदींची जहरी टीका

Satish Daud

गांधी कुटुंबियांच्या चार पिढ्यांनी राजकीय फायद्यासाठी वेळोवेळी राज्यघटनेत बदल करून भारतीय संविधानाचा अपमान केला, अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. माझ्यासाठी राज्यघटना राज्यकारभाराचा सर्वात मोठा ग्रंथ आहे. भाजप सत्तेत आल्यास संविधानात कुठलाही बदल केला जाणार नाही, असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. ते ओडिसातील पुरी येथील जाहीर सभेत बोलत होते.

देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. पाचव्या टप्प्यानंतर २५ मे रोजी सहावा टप्पा आणि १ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये ओडिसातील लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ओडिसाच्या पुरी येथे रोड शो केला.

त्यानंतर जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर जहरी टीका केली. काँग्रेसने आपल्या राजकीय फायद्यासाठी वेळोवेळी संविधानात बदल केला आहे, असा आरोप मोदींनी केला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह गांधी कुटुंबातील ४ सदस्यांनी त्यांच्या स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी राज्यघटनेचा वापर केल्याचं मोदींनी म्हटलं.

"गांधी घराणे राज्यघटनेशी खेळणारे पहिले कुटुंब असून पंडित नेहरू यांनी पहिली घटनादुरुस्ती आणली. त्यानंतर त्यांच्या मुलीने (इंदिरा गांधी) आपले पद वाचवण्यासाठी 'आणीबाणी' लादली. इंदिरा गांधी यांनी राज्यघटना बदलून माध्यमांवर निर्बंध आणले", असा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला.

२०१३ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या अध्यादेशाची प्रत फाडल्याबद्दल मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांनी अध्यादेशाची प्रत फाडल्यामुळे मंत्रिमंडळाने निर्णय मागे घेतला होता, अशी आठवणही मोदींनी करून दिली.

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या सन्माननीय सदस्यांबद्दल मला नितांत आदर आहे. ज्यांनी राज्यघटना तयार केली, त्यांनी चहा विकणाऱ्याला पंतप्रधान होण्याची संधी दिली. हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे. माझ्यासाठी राज्यघटना हा राज्यकारभाराचा सर्वात मोठा ग्रंथ आहे", असंही मोदी म्हणाले.

"लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर इंडिया आघाडीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता पुढील टप्प्यात आम्ही ४०० जागा पार करणार आहोत. आजही मी मतदारांना सांगेल, की घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करा", असं आवाहनही पंतप्रधान मोदींनी मतदारांना केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT