PM Modi Will Celebrates Diwali with Soldiers Saam Tv
देश विदेश

PM मोदी यंदाही भारतीय जवानांसोबत साजरी करणार दिवाळी; जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये होणार सेलिब्रेशन

PM Narendra Modi Diwali Celibration: जम्मू काश्मीरमधील जोरियनमधे 191 ब्रिगेडच्या जवानांसोबत ते दिवाळीचा आनंद घेणार आहेत.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी

PM Narendra Modi Diwali On Border:

देशभरात दिवाळीची धामधुम अन् उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तरुणाईचा मोठा प्रतिसाद या कार्यक्रमांना पाहायला मिळतोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही आपली दिवाळी सिमेवरील जवानांसोबत साजरी करणार आहेत. जम्मू काश्मीरमधील जोरियन मधे 191 ब्रिगेडच्या जवानांसोबत ते दिवाळीचा आनंद घेणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी जम्मूमधील छंब सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबत साजरी करणार आहेत. लष्कर किंवा जम्मू-काश्मीर प्रशासनाने शनिवारी रात्री उशिरापर्यंत पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केले नव्हते, परंतु संबंधित लष्करी तुकडीमध्ये त्यांच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीमेवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान ज्योदियांच्या राख मुठी भागात पोहोचणार आहेत, त्याबद्दल आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दिवाळी साजरी करून दिल्लीत परतण्यापूर्वी पंतप्रधान मोदी लष्करी परिषदेला संबोधित करणार आहेत.

दरम्यान, गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. 2014 मध्ये, पंतप्रधानांनी सियाचीन ग्लेशियरमध्ये, 2015 मध्ये अमृतसर, पंजाब आणि 2016 मध्ये हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.

यानंतर, सन 2017 मध्ये, पंतप्रधानांनी काश्मीरमधील गुरेझमध्ये, वर्ष 2018 मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये आणि 2019 मध्ये जम्मू विभागातील राजौरीमध्ये लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: 1 रूपयात पोटभर जेवण! टीम इंडियाच्या गुरूचं कौतुक करावं तितकं कमी, Video

Marathwada : १५०० कोटींपेक्षा अधिक निधी, पण शेतकऱ्यांना KYC नंतरच मदत, पुरानंतर पुराव्याचं संकट? | VIDEO

Marathi Actor : मराठी अभिनेत्यानं परदेशी गर्लफ्रेंडसह गुपचुप केलं लग्न, पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Kolhapur Tourism : कोल्हापूरमधील बेस्ट पिकनिक स्पॉट, येथे संध्याकाळी होते पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT