आज राज्यात सर्वत्र दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी पहाटसाठी मुंबईसह अन्य शहरांत देखील संगिताचे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमांना तरुणाईचा उत्स्फू्र्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशन'तर्फे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्यासमवेत कल्याणमध्ये सुरेल दिवाळी पहाट रंगली आहे. सुरेश वाडकरांच्या गाण्यांबरोबरच गायिका प्रियंका बर्वे या देखील आहेत.
कल्याण शहराला सांस्कृतिक वारसा असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा व कपिल पाटील फौंडेशनकडून सात वर्षांपासून कल्याण पश्चिम येथील खडकपाडामधील साई चौकात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातो. या दिवाळी पहाट कार्यक्रमाला कल्याणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या वेळी धार्मिक व भावगीतांबरोबरच मराठी-हिंदी चित्रपटांचा नजराणा रसिकांपुढे सादर करण्यात येतोय.
रायगडमध्ये दिवाळीला अभ्यंग स्नाने प्रारंभ
अभ्यंग स्नानाने रायगडमध्ये दिवाळीला प्रारंभ झाला. सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जात असून रायगडमध्ये अभ्यंग स्नानाने दिवाळी उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पहाटे रस्त्यावर आंघोळ करण्याची परंपरा रायगडमध्ये आहे.
गेल्या अनेक वर्षांची परंपारा जपत रायगडकरांनी रस्त्यावर आंघोळ म्हणजे दिवाळीचे अभ्यंग स्नान केले. आज नरक चतुदर्शी असल्याने नरकासुराच्या वधाचे प्रतिक म्हणुन चिराटू नावाचे कडू फळ पायाखाली फोडण्याची परंपरादेखील रायगडमध्ये पहायला मिळते. उभ्यंग स्नान झाल्यानंतर महिलांनी घरातील मुल, पुरुषांचे औक्षण केले. फटाके वाजवून लहान मुलांनी आनंद व्यक्त केला.
डोंबिवलीतील फडके रोड तरुणाईने बहरला
डोंबिवली शहर सांस्कृतिक शहर म्हणून प्रसिद्ध या शहरातील सांस्कृतिक ओळख जपणारा हा फडके रोड ,आप्पा दातार चौक ,गुडीपाडवा असो की दिवाळी ,या रस्त्यावर भल्या सकाळीच तरुणाईची जणू लाट उसळते.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकानी आयोजित केले जातात . फडके रोडवर मनसेकडून करण्यात आलेली रोषणाई देखील यंदा आकर्षण ठरली आहे. दिवाळी पहाट आणि फडके रोड यांचे अनोखे नाते असून तरुणाईच्या उपस्थितीने फडके रोड दरवर्षी नव्याने बहरतो . यंदा देखील लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी फडके रोड परिसरात तरुण तरुणी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमलेत. या रोडवर यंदा गणेश मंदिर संस्थान तर्फे , युवा सेना डोंबिवली शहर शाखेतर्फे दिवाळी पहाट सारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.