Pm Modi America Visit Saam Tv
देश विदेश

Pm Modi America Visit: 'एक भविष्य, एक पृथ्वी, एक व्यक्ती', पंतप्रधान मोदींचा योग दिनी अमेरिकेत नारा

Satish Kengar

International Yoga Day 2023: 'एक भविष्य, एक पृथ्वी, एक व्यक्ती', असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनी दिला आहे. आज जगभरात योग दिवस साजरा केला जात आहे.

यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत योग दिन साजरा केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनाही हा नारा दिला आहे. योग दिनानिमित्त अमेरिकेत आयोजित या कार्यक्रमात १८० देशातील प्रतिनिधी सहभाग घेतला होता.

'योग भारतातून आला, पण त्यावर कोणताही कॉपीराइट नाही'

यूएन मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''योग भारतातून आला आहे, परंतु त्यावर कोणताही कॉपीराइट नसून तो रॉयल्टी इत्यादीपासून मुक्त आहे. कोणत्याही वयोगटातील लोक हे करू शकतात.'' "संपूर्ण जग योगासाठी पुन्हा एकत्र आले हे पाहून आनंद झाला, असंही ते म्हणाले आहेत.  (Latest Marathi News)

याच कार्यक्रमात यूएनमधील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, ''आजचा दिवस खूप खास आहे, कारण लोक पंतप्रधान मोदींसोबत योग करतील.'' त्या पुढे म्हणाल्या की, ''मोदींच्या नेतृत्वाखालीच २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित करण्यात आला.''

दरम्यान, आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभागृहालाही संबोधित करणार आहेत. २३ जून रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन संयुक्तपणे पीएम मोदींच्या स्वागतासाठी डिनरचे आयोजन केले आहे. याव्यतिरिक्त पीएम मोदी हे सीईओ आणि भारतीय डायस्पोरा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT