Narendra Modi news Saam tv
देश विदेश

५ राज्यांच्या निवडणुका होताच मोदी सरकारने घेतले महत्वाचे निर्णय; कोण-कोणत्या राज्यांना होणार फायदा?

pm modi cabinet meeting : ५ राज्यांचा निवडणुका होताच मोदी सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शेती, सुप्रीम कोर्टाशी संबंधित अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

Vishal Gangurde

मोदी सरकारच्या कॅबिनेटचा निर्णयांचा धडाका

पंतप्रधान मोदी यांच्या घेण्यात आले महत्वाचे निर्णय

बैठकीत कृषी, टे्क्नोलॉजीशी इत्यादी क्षेत्राशी संबंधित महत्वाचे निर्णय

५ राज्यांच्या निवडणुका होताच मोदी सरकारच्या कॅबिनेटने निर्णयांचा धडाका लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. कृषी, टे्क्नोलॉजी आणि मेक इन इंडियाशी संबंधित अनेक निर्णय घेण्यात आले.

सरकारने कृषी क्षेत्र मजबूत करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ लाख कोटींची घोषणा केली. तसेच कापूस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. कापसाच्या गुणवत्तेत बदल झाल्यास जागतिक बाजारात मागणी वाढेल, या उद्देशाने सरकारने निर्णय घेतले आहेत.

टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उत्तर प्रदेशातील जेवरमध्ये सेमीकंडक्टर युनीट लावण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. सेमीकंडक्टर मोबाईलपासून कारपर्यंत फायदेशीर ठरणार आहे. यामुळे भारताकडून आयात कमी होईल. देशात चिप मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन मिळेल. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

सरकारने जयपूर मेट्रो फेज -२ सारख्या मोठ्या प्रकल्पाला देखील मंजुरी दिली आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल होतील. या व्यतिरिक्त १७२० मेगावॅट आणि १२०० मेगावॅटसारख्या हायड्रो पॉवर प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. यामुळे वीज उत्पादनास प्रोत्साहन मिळेल. एफडीआयच्या धोरणात बदल करून गुंतवणूक सोपी करण्याचा प्रयत्न आहे.

सरकारने सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या ३८ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या सुप्रीम कोर्टात ३४ न्यायाधीश आहेत. सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या वेळोवेळी वाढवली जाते. १९५६ साली सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या १० होती. पुढे १९६०, १९८६, २००९ आणि २००९ साली ही संख्या वाढवण्यात आली. आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांना वगळून सुप्रीम कोर्टात एकूण ३३ न्यायाधीश होते. परंतु आता नव्या प्रस्तावानुसार न्यायाधीशांची संख्या ३८ करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ ची भरती स्थगित

Cabinet Expansion: मोठी राजकीय घडामोड, मंत्रिमंडळ विस्तार होणार; 'सम्राट' सरकारमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

रस्त्यावर सोन्याचा पाऊस? सोनं वेचण्यासाठी लोकांची झुंबड?

Crime News: नवरदेवाला 200 रुपयांची नोट दाखवत विचारला एक प्रश्न; उत्तर ऐकताच नवरीने मोडलं लग्न

अखेर गोकुळवर 'प्रशासकराज', गोकुळसाठी भाजपचा मोठा डाव?

SCROLL FOR NEXT