Pm Narendra Modi Cabinet Minister Suresh Gopi Money Control
देश विदेश

Suresh Gopi: माझ्या राजीनाम्याच्या बातम्या चुकीच्या: केंद्रीय मंत्री सुरेश गोपी

Pm Narendra Modi Cabinet Minister Suresh Gopi: एका मल्याळम टीव्ही चॅनलने सुरेश गोपी हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त दिलं होतं. त्यावर केरळमधील भाजपचे एकमात्र खासदार गोपी यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Bharat Jadhav

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात राज्यमंत्री झालेले सुरेश गोपी यांनी मंत्रीपद सोडल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं म्हटलंय. माझ्या राजीनामा बाबत काही माध्यम चुकीच्या बातम्या चालवत असल्याचं सुरेश यांनी सोशल मीडियाच्या X वर लिहिलंय.

मी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देणार आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहोत. पण काही माध्यमे चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, असं सुरेश गोपी म्हणालेत.

एका मल्याळम टीव्ही चॅनलने गोपीचा हवाला देत दावा केला होता की, सुरेश गोपी यांना मंत्री बनायचे नाही. पण ते खासदार म्हणून काम करतील. लोकसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर अभिनेता ते राजकारणी झालेले गोपी म्हणाले होते की, ते चित्रपटसृष्टी सोडणार नाहीत, कारण अभिनय ही त्यांची आवड आहे. त्याच्याकडे आधीच काही चित्रपटांचे काम बाकी असल्याचं गोपी म्हणाले असल्याचा दावा या वृत्तात केला गेला होता.

दरम्यान गोपी हे केरळमधील भाजपचे पहिले खासदार आहेत. त्यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. सीपीआयचे सुनील कुमार यांचा सुमारे ७५ हजार मतांनी त्यांनी पराभव केलाय. लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारादरम्यान अभिनेता ते खासदार झालेले सुरेश गोपींनी त्रिशूरसाठी एक केंद्रीय मंत्री , मोदीची गॅरंटी या घोषणेवर निवडणुकीचा प्रचार केला होता.

सुरेश गोपी यांची मुलगी भाग्य सुरेश हिचा विवाह बिजनेसमन श्रेयस मोहनसोबत १७ जानेवारी रोजी झाला होता. या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधानांनी केरळचा पारंपरिक पोशाख - मुंडू आणि वेष्टी परिधान केला होता. या लग्नसोहळ्यात पीएम मोदींनी २५ मिनिटे थांबले होते. पंतप्रधान मोदींनी गुरुवायर मंदिरात या जोडप्याला आशीर्वाद दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT