PM Narendra Modi British PM Boris Johnson meet (एएनआ) SAAM TV
देश विदेश

ब्रिटनचे PM बोरिस जॉन्सन म्हणाले, मला अमिताभ बच्चन झाल्यासारखं वाटतंय!

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज, शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत बोरिस यांनी सचिन तेंडुलकरचाही उल्लेख केला.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राजधानी दिल्लीत हैदराबाद हाऊसमध्ये बैठक झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये दोन्ही देशांतील संबंध आणि व्यापार याबाबत सविस्तर चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांनी बैठकीनंतर संयुक्तपणे निवेदन जाहीर केलं. विशेष बाब म्हणजे, बोरिस जॉन्सन यांनी हिंदी भाषेतच पंतप्रधान मोदी यांना 'खास दोस्त' असे संबोधले. ज्या प्रकारे भारतात माझं स्वागत झालं, त्यामुळं खूपच आनंद झाला. येथे सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चनसारखं वाटतंय, असंही बोरिस जॉन्सन म्हणाले.

बोरिस जॉन्सन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमधील संबंध आणि व्यापार यांसह विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'भविष्यासाठी आम्ही लक्ष्य निश्चित केले आहे. भारत-ब्रिटन मुक्त व्यापार (एफटीए) करारासाठी सुरू असलेल्या चर्चेत चांगली प्रगती होत आहे. आम्ही या वर्षाच्या अखेरीपर्यंत भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे.'

दोन्ही देशांची टीम मुक्त व्यापार करारावर काम करत आहे आणि चर्चेमध्ये प्रगती होत आहे. यावर्षीच्या अखेरीपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. आम्ही ब्रिटनला भारताच्या राष्ट्रीय हायड्रोजन मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित करत आहोत, असंही मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी युक्रेन मुद्द्याचाही उल्लेख केला. युक्रेनमध्ये तात्काळ युद्धविराम आणि समस्येवर तोडगा काढण्यासाठी चर्चा आणि कूटनितीवर आम्ही जोर दिला. तसेच आम्ही सर्व देशांची प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या सन्मानाचं महत्वही अधोरेखित केले, असंही मोदी म्हणाले. बोरिस जॉन्सन म्हणाले, की 'आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत झाले आहेत. हवाई, अंतराळ आणि सागरी क्षेत्रातील धोक्यांचा निपटारा करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. या भेटीमुळं दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ झाले आहेत.'

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

ऐन निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का; लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले, कारण काय?

अजितदादांच्या जाहीरनाम्यात मेट्रो प्रवास मोफत, फडणवीसांनी उडवली दादांची खिल्ली

रवींद्र चव्हाण पडले मौलवींचे पाया? मौलवी भाजपच्या सभेत?

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचे 'कॅन्डिडेट बॉम्ब'; १५ कोटींची ऑफर नाकारणारे उमेदवार स्टेजवरच आणले

SCROLL FOR NEXT