Covid-19: गेल्या २४ तासांत भारतात २ हजार ४५१ नवे कोरोना रुग्ण; एकूण रुग्णसंख्या १४,२४१

India New Covid-19 Cases: इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, २१ एप्रिलपर्यंत कोविड-19 साठी ८३ कोटी २८ लाख २५ हजार 991 नमुने तपासण्यात आले आहेत.
Corona In India, Corona Latest News Updates, Corona Cases Today
Corona In India, Corona Latest News Updates, Corona Cases TodaySaam Tv

नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत भारतात २ हजार ४५१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत कोराना (Coronavirus) संसर्गामुळे ५४ मृत्यू झाले आहेत. शुक्रवारी (२२ एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत एकूण १ हजार ५८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहेत. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.७६ टक्के झाले आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात कोविड-19 ची एकूण सक्रिय प्रकरणे १४ हजार २४१ (0.03%) वर पोहोचली आहे. काल, सक्रिय रुग्णसंख्या १३ हजार ४३३ एवढी होती. देशातील एकूण मृतांची संख्या आता ५ लाख २२ हजार ११६ इतकी झाली आहे. भारतात, मार्च २०२० मध्ये कोविड महामारीमुळे (Covid-19) पहिला मृत्यू नोंदवला गेला होता. (Over 2,400 new corona cases in india and 56 fatalities in last 24 hours)

हे देखील पहा -

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, २१ एप्रिलपर्यंत कोविड-19 साठी ८३ कोटी २८ लाख २५ हजार 991 नमुने तपासण्यात आले आहेत. यापैकी ४ कोटी ४८ लाख 939 नमुन्यांची गुरुवारी चाचणी करण्यात आली. दरम्यान, देशात कोविड-19 ची प्रकरणे वाढत असताना, पंजाब सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य असेल असं गुरुवारी जाहीर केलं. या सूचनांमध्ये पंजाब सरकारने म्हटले आहे की, बस, ट्रेन, विमान, सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, ऑफिसेस आणि क्लासरूम्स यासारख्या बंद वातावरणात मास्क घालण्याची खात्री करावी.

Corona In India, Corona Latest News Updates, Corona Cases Today
रोहिणी न्यायालय परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांकडून गोळीबार; २ जखमी

पंजाबमध्ये बुधवारी ३० नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि कोरोना रुग्णांची संख्या ७,५९,३३४ झाली. उत्तर भारतातील अनेक राज्यांनी, विशेषत: दिल्लीच्या आसपासच्या राज्यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी, भारतात २४ तासांत २००० हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com