PM Narendra Modi Offer to NCP Chief Sharad Pawar : राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून शरद पवार यांना थेट ऑफर देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मोदींनी पवारांना केंद्रात स्थान आणि मोठं खातं देऊ केल्याची माहिती आता समोर येत आहे.
अजित पवारांच्या बंडानंतर आता थेट शरद पवारांनाच सोबत घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पवारांना सोबत घेण्यासाठी भाजपचा एक गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पवारांनी भाजपसोबत जाण्यासा उघडपणे दर्शवलेल्या नकारानंतरही भाजपकडून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरु आसल्याची माहिती आहे. पवारांना थेट पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रीमंडळात मोठं स्थान आणि मोठं खातं देण्याची ऑफर दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Tajya Marathi Batmya)
पवार सध्या तरी भाजप विरोधी भूमिकेत
काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षात मोठी बंडखोरी करत वेगळा गट केला आणि भाजप-शिवसेना युती सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कालच अजित पवारांनी सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भरघोस निधीची वाटप केली. त्यानंतर शरद पवारांसोबत असलेल्या आमदरांमध्ये पुन्हा दोन गट पडल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपकडून जर पवारांना मोठी ऑफर मिळाली तर पवार काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या या ऑफरच्या बातमीवर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे आता राज्यासोबत देशाचंही लक्ष लागलं आहे. (Latest Political News)
पवारांच्या प्रतिक्रियेकडे देशाचं लक्ष
शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीरपणे भाजपसोबत जाणार नसल्याचे सांगतिले आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीत दोन गट पडले अशी देखील चर्चा आहे. तसेच शरद पवार यांनी नुकत्याच बेंगळुरू येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या बैठकीलाही उपस्थिती लावली होती. त्यामुळे सध्या तरी शरद पवार भाजप विरोधी भूमिकेत दिसत आहेत. परंतु भाजपकडून त्यांना केंद्रात मोठं खातं देण्याची ऑफर असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. या बातमीवर पवार काय प्रतिक्रिया देतात हे पहावं लागणार आहे. याबाबत पवार लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट करू शकतात. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.