PM Modi Address to Nation  Saan tv
देश विदेश

Narendra modi on Pakistan : आता फक्त दहशतवाद, पीओकेवरच चर्चा होईल; PM नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला मोठा इशारा, VIDEO

PM Modi Address to Nation on Operation Sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूरवरून भारतीयांना संबोधित केलं. यावेळी मोदींनी पाकिस्तानला मोठा इशारा दिला.

Vishal Gangurde

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ला आणि शस्त्रसंधी उल्लंघनावरून पाकिस्तानवर तोफ डागली. पाकिस्तानच्या भूमिकेवर पंतप्रधान मोदींनी कठोर शब्दात टीका केली. युद्धविरामानंतर आता चर्चा फक्त दहशतवाद आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर होईल, अशा कठोर शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला.

पाकिस्तानच्या हल्यानंतर भारतीय सैन्य दलाने दिलेल्या चोख प्रत्युत्तराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. पाकिस्तानातील दहशतवादी आणि ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींनी मोठं भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर सडेतोड उत्तर दिलं जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अटींवर प्रत्युत्तर देऊ. त्या जागेवर जाऊन कठोर कारवाई करू, जिथे दहशतावादाचं मूळ आहे'.

'अणुहल्ल्यावरून ब्लॅकमेल करणे भारत खपवून घेणार नाही. भारत लक्ष्यभेद करणार, निर्णायक प्रहार करणार. दहशतवाद्यांना पोसणारं सरकार आणि दहशतवादी म्होरक्यांना वेगवेगळे पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगाने पाकिस्तानचा खरा चेहरा बघितला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना अत्यंयात्रेला मोठेमोठे अधिकारी उपस्थित होते. हा मोठा पुरावा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

'भारत आणि आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी नेहमीच पावलं उचलत राहू. युद्धाच्या मैदानावर प्रत्येक वेळी पाकिस्तानला धूळ चारली आहे. यावेळी ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिलं आहे. आपल्या क्षमता दाखवून दिली. श्रेष्ठता सिद्ध केली. या ऑपरेशनदरम्यान भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची क्षमता सिद्ध झाली. प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाविरोधात सगळ्यांची एकजूट राहणे, एकता ही सर्वात मोठी ताकद आहे, असे पंतप्रधान मोदी पुढ म्हणाले.

'निश्चितपणे हे युग युद्धासाठी नाही. पण हा युग दहशतवादाचाही नाही. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स हा एक चांगल्या युगाची हमी आहे. पाकिस्तानी सैन्य, सरकार ज्या पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालतंय. ते एक दिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेल. जर त्यांना वाचायचं असेल तर त्यांना दहशतवाद नष्ट करावं लागेल. शांततेचा दुसरा कोणताच मार्ग नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

'दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. मी आज जगाला सांगतो की, आमची घोषित नीती आहे की, जर पाकिस्तानशी चर्चा झाली तर दहशतवादावरच होईल. पाकव्याप्त काश्मीर म्हणजे पीओकेवरच होईल, असे मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime News : दारू देण्यास नकार, तरुणांची सटकली; हॉटेल मालकावर अंदाधुंद गोळीबार, जळगावमध्ये खळबळ

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

Pune News: गणेशोत्सवाआधी पुण्यातील ढोल-ताशा पथकांना आनंदाची बातमी, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

GK: सूर्योदय-सूर्यास्त वेळी सूर्य लाल का असतो? यामागे लपलंय रहस्य

Kapil Sharma : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील रेस्टॉरंटवर गोळीबार | VIDEO

SCROLL FOR NEXT